breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

खासदार संजय राऊतांचे शिवसेनेतील वर्चस्व कसं वाढलं; कोणत्या गोष्टी ठरल्या कारणीभूत?

मुंबईः राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. शिवेसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील अंतर्गंत कलह चव्हाट्यावर आला आहे. बंडखोर आमदारांनी राष्ट्रवादी- काँग्रेससोबत स्थापन केलेल्या सत्तेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादी- काँग्रेससोबतच्या आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत युती करावा, असा प्रस्ताव शिंदेगटाकडून देण्यात आला आहे. शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसेनेच फूट पडली असून दोन गट निर्माण झाले आहेत. तर, एकीकडे सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह, आदित्य ठाकरे व संजय राऊत (Sanjay Raut) मैदानात उतरले. मात्र, संजय राऊतांनी बंडखोर आमदारांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं राज्यातील घडामोडींनी वेगळं वळण घेतलं आहे. मात्र, या राजकीय घडामोडी सुरू असताना संजय राऊत यांचा शिवसेनेतील प्रवास कसा झाला, याचा या लेखातून घेतलेला आढावा. (Maharashtra Political Crisis)

कधीही जनतेतून निवडून आले नाहीत, ते संजय राऊत पक्ष संपवायला निघाले आहेत. संजय राऊत हेच शरद पवारांच्या गळ्यातील ताईत आहेत, शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी संजय राऊतांवर थेट आरोप केले आहेत. त्यामुळं संजय राऊत यांचा मातोश्रीतील निर्णयांमधील सहभाग आणि भूमिका याबाबत सातत्याने चर्चा होत आहे. २०१९मध्ये भाजप- शिवसेना युती तुटल्यानंतर संजय राऊत यांच्या पुढकाराने राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन पक्षाचं मिळून महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं. मात्र, तेव्हाच शिवसेनेत वादाची ठिणगी पडल्याचं काही राजकीय विश्लेषक सांगतात.

आज शिवसेनेत जी दुफळी माजली आहे त्याला संजय राऊत जबाबदार असल्याचा आरोप सातत्याने होत आहेत. २०१९च्या विधानसभा निवडणुकानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यात सत्तावाटपावरुन मतभेद झाले. तेव्हा संजय राऊत यांनी पुढकार घेत महाविकास आघाडीची मोट बांधली. भाजपने अडीच -अडीच वर्षांच्या फॉर्मुल्याची अट मान्य न केल्यास युती तोडून राष्ट्रवादी- काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला. तसंच, सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वासही दिला, अशी दबक्या आवाजातील चर्चा आहे. त्यामुळं मातोश्रीवरील निर्णया प्रक्रियेत संजय राऊतांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचं दिसून येते.संजय राऊत यांचा प्रवास

६१ वर्षीय संजय राऊतांचे गाव रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील चौंदी हे गाव आहे. १९८०मध्ये संजय राऊतांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये काम सुरु केलं. त्यानंतर त्यांनी साप्ताहिक लोकप्रभामध्ये क्राइम आणि राजकीय पत्रकार म्हणून नोकरी करत होते.

शिवसेनेत एंट्री

संजय राऊत यांच्यातील पत्राकारितेचे गुण पाहून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संजय राऊतांनी शिवेसनेचे मुखपत्र मार्मिकमध्ये रुजू करुन घेतले. मार्मिकमध्ये काम करत असताना संजय राऊत श्रीकांत ठाकरेंच्या संपर्कात आले. श्रीकांत ठाकरे यांच्यासोबत त्याची जवळीक वाढत गेली तर, शिवसेनेतील त्यांचा प्रभावही वाढत होता. १९८४मध्ये संजय राऊत पहिल्यांदा प्रमोद नवलकर, दत्ताजी साळवी आणि वामनराव महाडिक यांच्यासारख्या सेनेतील दिग्गज नेत्यांसोबत मंचावर स्थान मिळवले. निमित्त होतं मार्मिकच्या वर्धापन दिन सोहळ्याचा.

सामनाचे संपादक

१९८९मध्ये शिवसेनेनं सामनाचे प्रकाशन सुरू केलं. वरिष्ठ पत्रकार अशोक पडबिद्री कार्यकारी संपादक होते. त्यांच्यानंतर संजय राऊत १९९३ला कार्यकारी संपादक पदावर रुजू झाले. राऊतांच्या लिखाणाच्या शैलीमुळं सामनातील अग्रलेख राऊत लिहित होते. पक्षाने २००४ साली प्रथम राऊतांनी राज्यसभेवर पाठवलं. त्यानंतर आत्तापर्यंत चारवेळा शिवसेनेनं संजय राऊतांना राज्यसभेवर पाठवलं आहे. दिल्लीत पक्षाचा आक्रमक चेहरा म्हणून संजय राऊतांना ओळखलं जातं.

भाजप- शिवसेना युती

भाजप आणि शिवसेनेची १९८४मध्ये युतीची चर्चा झाली. त्यानंतर १९८९मध्ये दोनी पक्षांनी हातमिळवणी केली. मात्र, राऊतांनी कधीच भाजपला आपला सहकारी मानलं नाही. शिवसेनेत असतानाही ते भाजपपासून दूर होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसबाबत त्यांची भूमिका नेहमीच सौम्य होती. २००८ राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून एक प्रयत्न करण्याद आला होता. शिवसेनेने भाजपची साथ सोडायची आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत एकत्र यायचं, असा प्रयोग करता येईल का, याची चाचपणी करण्यात आली होती. हा प्रयोग करण्यामागचा विचार संजय राऊत यांचाच होता. पण त्या प्रयोगाचं पुढे काही होऊ शकलं नाही, असं एका वृत्तपत्रानं म्हटलं आहे.

२०१४नंतर अधिक आक्रमक

२०१४नंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर राऊतांनी भाजपवर हल्ला चढवला होता. त्यावेळस शिवसेनेला स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवावी लागली होती. निवडणुकानंतर भाजपच्या अधिक जागा आल्या. त्यानंतर शिवसेना- भाजप युती पुन्हा झाली व देवेंद्र फडणवीस युती सरकारमध्ये मुख्यमंत्री झाले. तेव्हासुद्धा सामनातून भाजपविरोधात लिखाण करण्यात आलं होतं. शिवसेनेत संजय राऊत यांनी विशेष स्थान आहे. राऊतांचे पक्षातील स्थान कधीच ढळलं नाही. मातोश्रीवरही त्यांचा सहज वावर असल्याचं बोललं जातं. म्हणूनच सलग चार वेळा त्यांना राज्यसभेवर पक्षनेतृत्वाकडून पाठवण्यात आलं.

दरम्यान, मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. मात्र, शिवसेना नेतृत्वाच्या मनातही एकनाथ शिंदे यांच्याकडे सरकारची सूत्रे देण्याबाबतचा विचार घोळत होता; मात्र संजय राऊत, सुभाष देसाई, अनिल परब यांनी त्याला विरोध केल्याची कुजबूज पक्षात त्यावेळी झाली होती. शिवसेना पक्षात आणखी एक नारायण राणे निर्माण होईल आणि मग तो पक्षाला डोईजड होईल, अशी कारणे देत उद्धव ठाकरे यांचे कान भरण्यात आले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री बनण्याचा रस्ता आपोआपच रोखला गेला. यावरुन संजय राऊत यांचे पक्षातील वर्चस्व दिसून येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button