Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी

उन्हाळ्यातही तुमचा चेहरा उजळेल, रोज ‘या’ 6 हंगामी फळांचा आणि भाज्यांचे करा सेवन

Health : ऋतू नुसार हंगामी फळ आणि भाज्या अधिक ताजे असल्याने अधिक चवदार लागतात. त्यासोबतच हंगामी फळ-भाज्यां आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. कारण यामध्ये त्या ऋतूला अनुकूल अशी नैसर्गिक पोषक तत्वेही असतात. निसर्गाने आपल्याला विविध तापमान आणि परिस्थितींमध्ये निरोगी राहण्यासाठी आवश्यक असलेले सर्व काही दिले आहे. उन्हाळ्यातील फळे आणि भाज्या तुमच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी वरदान ठरतात. अशातच उन्हाळा सुरू झाला की आरोग्यासोबतच त्वचेच्या समस्या निर्माण होतात. आपल्यापैकी अनेकजण या ऋतूत त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती उपायांचा अवलंब करतात. कारण उष्ण तापमानात त्वचा हायड्रेट राहावी यासाठी वेगवेगळ्या फळ भाज्यांच्या रसांचा वापर चेहऱ्यावर केला जाते. मात्र त्वचेला आतून हेल्दी ठेवण्यासाठी उन्हाळ्यात या 6 हंगामी फळ-भाज्यांचा आहारात समावेश करा. जे तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरतील. चला तर मग आजच्या लेखात आपण अशा काही फळ-भाज्यांबद्दल जाणून घेऊयात जे त्वचेला चमकदार बनवण्यास मदत करतात.

दुधी भोपळा ही एक उत्तम भाजी आहे : ही उन्हाळी भाजी केवळ तुमच्या पचनासाठीच उत्कृष्ट नाही, तर तुमच्या त्वचेसाठीही फायदेशीर आहे. पाण्याने समृद्ध असल्यामुळे दुधी भोपळा त्वचेला आर्द्र ठेवून मऊ ठेवते. तिच्या थंड गुणधर्मामुळे उन्हाळ्यात त्वचेला मुरुमांपासून वाचवण्यास मदत होते.

काकडी खा : उन्हाळ्यात काकडी सेवन त्वचा आतून निरोगी ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहे. यामुळे डोळ्यांखालील काळी वर्तुळे देखील कमी होतात. काकडी खाण्याव्यतिरिक्त, तिचा रस देखील पिऊ शकतो आणि चेहऱ्यावर लावू शकतो. काकडीमध्ये पाणी आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे त्वचेला आर्द्रता मिळण्यास आणि कोलेजन वाढण्यास मदत होते. हेल्थलाइननुसार 301 ग्रॅम काकडीमध्ये 8 ग्रॅम व्हिटॅमिन सी असते.

हेही वाचा –  नोरा फतेहीला भारत सोडावं लागणार? वर्क परमिट होणार रद्द? मंत्रालयात पोहोचली 10 वकिलांची टीम

कलिगंड उन्हाळी फळ : उन्हाळ्यात आपल्या आहारात कलिगंडाचा समावेश केल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत तर होतेच, शिवाय त्वचेलाही फायदा होतो. हे फळ व्हिटॅमिन सी सह अनेक पोषक तत्वांचा खजिना आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या मते, 100 ग्रॅम टरबूजामध्ये 8.1 मिग्रॅ व्हिटॅमिन सी असते.

लिंबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते : व्हिटॅमिन सीच्या बाबतीत बोलायचे झाले तर लिंबाच्या रसाचे सेवन करणे उत्कृष्ट मानले जाते. लिंबू सर्व ऋतूंमध्ये उपलब्ध असले तरी, उन्हाळ्यात ते खरोखरच एक वरदान ठरतात. लिंबू पाणी कडक उन्हापासून त्वरित आराम देते आणि त्वचा उजळण्यास मदत करते. व्हिटॅमिन सीने समृद्ध असल्यामुळे ते शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास देखील उपयुक्त ठरते. ते त्वचेवर लावल्याने त्वचेची टॅनिंग दूर होण्यास मदत होते. मात्र हे लक्षात ठेवा की लिंबू कधीही थेट त्वचेवर लावू नये.

लिची पोषक तत्वांनी परिपूर्ण असते : लिची हे उन्हाळ्यातील एक आवडते हंगामी फळ आहे. आंबट-गोड चवीची रसाळ लिची तुमच्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे, कारण ती व्हिटॅमिन सी सह अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. हेल्थलाइननुसार, एका लिचीमधून तुमच्या दैनंदिन गरजेच्या व्हिटॅमिन सीच्या सुमारे 9 टक्के गरज पूर्ण होते.

शिमला मिरचीचे सेवन करा : शिमला मिरची ही एक अशी भाजी आहे जिची वर्षातून तीन वेळा पीक घेतलं जाते, त्यामुळे ती हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात दोन्ही ऋतूंमध्ये बाजारात उपलब्ध असते. शिमला मिरची त्वचेसाठी उत्तम असते, कारण ती व्हिटॅमिन सी, तसेच व्हिटॅमिन ए आणि ई ने समृद्ध असते. तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या, लाल आणि पिवळ्या शिमला मिरच्यांचा विविध प्रकारे समावेश करू शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button