जागतिक डॉक्टर दिन: करोना काळामध्ये महत्वपूर्ण भूमिका पार पाडणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार- गणेश जवळकर
![World Doctor's Day: Reception of doctors who played an important role in the Corona period - Ganesh Jawalkar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/WhatsApp-Image-2021-07-01-at-6.33.18-PM.jpeg)
- छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन रहस्य हे पुस्तक देऊन सत्कार
मुंबई |
आज जागतिक डॉक्टर दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला, विविध पद्धतीने नागरिकांनी शुभेच्छा देऊन आभार व्यक्त केले. त्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये कासारवाडी येथील सामजिक कार्यकर्त्यांनी आभार व्यक्त केले. डॉक्टर डे निमित्त करोना काळा मध्ये महत्वपूर्ण भूमिका पार पाडणाऱ्या कासारवाडी भागातील डॉ पांडुरंग लांडगे, डॉ सुनील राऊत , डॉ अरुणा मॅडम , डॉ भंडारी मॅडम ,डॉ मोहिनी ठेंगणे ,व्यवस्थापक गणेश व्यंकटेश जवळकर व पालिका लसीकरण केंद्रावरील सर्व नर्स,मदतनीस यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन रहस्य हे पुस्तक व गुलाब पुष्प भेट देण्यात आले यावेळी गोरख तात्या जवळकर,अप्पा धावडे, संतोष धावडे, शुभम जवळकर , शशिकांत शेडे , संजय बनणे उपस्तिथ होते. गणेश बबन जवळकर (सरचिटणीस भाजप युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर) यांच्या नियोजनाने कार्यक्रम मार्गी लावला.