उन्हाळ्यात काळे कपडे का घालू नयेत? काय आहे यामागचे कारण?
![Why not wear black-yellow, red-blue clothes in summer](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Summer-Clothes-780x470.jpg)
Summer Cloths | उन्हाळा सुरू झाला असून घाम येऊ नये म्हणून लोकांनी हलके कपडे खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. या हंगामात लोक त्यांच्या पोशाखांबद्दल अधिक चिंतित असतात. कारण लोक वाढत्या तापमान आणि उष्णतेमुळे हलके कपडे घालण्यास प्राधान्य देतात. काही लोक या हंगामात फक्त सुती कपडे घालण्याला जास्त प्राधान्य देतात. कारण त्यांना इतर कापड गरम वाटते. अशा परिस्थितीत कापूस व्यतिरिक्त काही फॅब्रिक्स आहेत जे परिधान केल्यावर गरम वाटत नाही.
याशिवाय नागरिक उष्णतेपासून वाचण्यासाठी सर्व प्रकारच्या पद्धती वापरत असतात. बाहेर जाताना आपण हलके कपडे घालतो. तसेच काळ्या आणि गडद रंगाच्या कपड्यांमध्ये खूप गरम वाटतं असं आपण अनेकदा ऐकतो. त्यामुळे लोक उन्हाळ्यात असे कपडे घालणे टाळतात. शेवटी या रंगांचे कपडे जास्त गरम वाटण्यामागे काय कारण आहे? चला जाणून घेऊयात.
हेही वाचा – वाघोलीत टँकरच्या चाकाखाली येऊन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, अपघाताचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद
उन्हाळ्यात काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळावे
काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये जास्त उष्णता असल्यामागचे कारण म्हणजे हा रंग उष्णता शोषून घेतो. उन्हाळ्यात काळ्या रंगाचे कपडे घातल्याने शोषली जाणारी उष्णता लवकर परावर्तित होत नाही. त्यामुळे शरीराला जास्त उष्णता जाणवते. यामुळे उन्हाळ्यात काळे कपडे घालणे लोकांना आवडत नाही. तसेच सूर्याची किरणे काळ्या आणि गडद रंगाच्या कपड्यांवर पडतात तेव्हा ते जास्त काळ टिकून राहतात. ते लगेच तिथून हटत नाहीत. यामुळे हे कपडे जास्त काळ उबदार राहतात आणि परिधान करणाऱ्यांना जास्त गरम वाटते.
हलक्या रंगाचे कपडे घाला :
उन्हाळ्यात सूर्यप्रकाश अधिक मजबूत असतो. त्यामुळे हलक्या रंगाचे कपडे घालावेत. कारण हलके रंग प्रकाश परावर्तित करतात. ज्यामुळे उष्णता कमी होते. याउलट थंडीत गडद रंगाचे कपडे घालावेत. गडद रंगाचे कपडे उष्णता शोषून घेतात आणि शरीराला उबदारपणा देतात आणि त्यामुळे हिवाळ्यात थंडीपासून आराम मिळतो. उन्हाळ्यात, कापूस, शिफॉन, जॉर्जेट, क्रेपसारखे पातळ आणि हलके कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे हवा सहजतेने जाऊ शकते.