breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

Pune | वाघोलीत टँकरच्या चाकाखाली येऊन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, अपघाताचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

पुणे | वाघोली परिसरात एक अपघाताची घटना घडली आहे. टँकरच्या चाकाखाली येऊन एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राजेंद्र तुकाराम बोंडे (रा. वडगाव शेरी) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तसेच या अपघातात एका पादचाऱ्यासह तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा    –    ‘पिंपरी विधानसभेतून ६० हजार पेक्षा जास्त मतांचा लीड देणार’; अमित गोरखे 

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दुचाकीस्वार विरुद्ध बाजूने टँकरला ओव्हरटेक करत असताना हा अपघात घडला आहे. दुचाकीस्वार राजेंद्र बोंडे हे टँकरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसापासून पुणे-नगर रोडवर बेशिस्त वाहन चालकांमुळे अपघातांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत एक मार्चपासून आजपर्यंत रस्ते अपघातात जवळपास नऊ ते दहा लोकांन आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button