breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडी

World AIDS Day 2023 : १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या सविस्तर

World AIDS Day 2023 : जगभरात एड्स या आजाराबाबत लोकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी दरवर्षी १ डिसेंबर रोजी वर्ल्ड एड्स डे साजरा करण्यात येतो. ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस (HIV) मुळे होणाऱ्या ऍक्वायर्ड इम्यून डेफिशियन्सी सिंड्रोम (AIDS) या गंभीर आजाराबद्दल जगभरात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि या आजाराने पीडित असलेल्या व्यक्तींना पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि समर्थन देण्यासाठी दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस ‘जागतिक एड्स दिन’ म्हणून साजरा केला जातो.

जागतिक आरोग्य संघटनेच्या एड्स ग्लोबल कार्यक्रमात काम करणाऱ्या थॉमस नेट्टर आणि जेम्स डब्ल्यू यांनी जागतिक एड्स दिवस साजरा करण्याचा विचार १९८७ मध्ये मांडला होता. त्यानंतर १९८८ पासून १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिवस साजरा करण्यात येतो. एड्स हा असा आजार आहे, ज्यांच्यावर अद्याप कोणताही प्रभावी उपचार वैज्ञानिकांना सापडलेला नाही.

हेही वाचा  –  भारतात मोबाइल नंबर हा दहा आकडीच का वापरला जातो?

यापासून बचाव करणं हा या आजारावरील एकमेव उपचार आहे. हा आजार ह्यूमन इम्युनो डेफिशियन्स (HIV) व्हायरसच्या संसर्गामुळे होतो. एचआयव्हीपासून बचाव करण्यासाठी जागरुकता अत्यंत आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला इंजेक्शन देण्यासाठी वापरलेली सुई पुन्हा वापरु नये. सुरक्षित लैंगिक संबंध ठेवावे. तसेच एखाद्या व्यक्तीने वापरलेलं ब्लेड शेविंग करण्यासाठी वापरु नये.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button