breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडी

Kojagiri Purnima 2023 : कोजागिरी पौर्णिमेचे महत्व काय? मुहूर्त आणि तिथी जाणून घ्या..

Kojagiri Purnima 2023 : अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा कोजागरी पौर्णिमा म्हटले जाते. पौराणिक कथांनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो, ज्या दिवशी ती समुद्र मंथनातून प्रकट झाली होती, जाणून घ्या अधिक माहिती..

कोजागिरी पौर्णिमेचे महत्वा काय?

कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री भगवान इंद्र लक्ष्मी, चंद्र व कुबेर यांची पूजा केली जाते. असे मानलं जाते की, कोजागिरी पौर्णिमेला या देवता देवलोकातून पृथ्वीतलावर आशीर्वाद देण्यासाठी येतात आणि लोक त्यांना प्रसन्न करण्यासाठी जागरण करून आटवलेल्या अमृत स्वरूप दुधाचा नैवेद्य या देवतांना दाखवून प्रसन्न करतात म्हणून कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येते. कोजागिरी पौर्णिमाच्या रात्री लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा केल्या लक्ष्मी प्रप्त होते अशी मान्यता आहे.

कोजागिरी पौर्णिमेचा मुहूर्त कधी?

अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा असे म्हटले जाते. २८ ऑक्टोबरला पहाटे 4 वाजून १७ मिनिटांनी पौर्णिमा सुरू होत आहे. ही पौर्णिमा २९ ऑक्टोबरला सकाळी १ वाजून ५३ मिनिटांनी संपेल.

हेही वाचा – महाराष्ट्रातील अनेक शहरांचा पारा घसरला, थंडीची लाट येणार

परंतु, पौर्णिमेच्या चंद्रोदयाची वेळ आणि उदय तिथी दोन्ही २८ ऑक्टोबरला म्हणजे शनिवारी येत असल्यामुळे कोजागिरी पौर्णिमा २८ ऑक्टोबरलाच साजरी करण्यात येईल. कोजागिरी पौर्णिमेला चंद्रोदयाची वेळ ही २८ ऑक्टोबरला संध्याकाळी ५ वाजून २० मिनिटांनी सुरू होणार आहे.

कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी पूजेचे मुहूर्त कधी?

कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी देवीची आराधना आणि पूजा केली जाते. कोजागिरीच्या रात्री लक्ष्मी देवीची पूजा करण्यासाठी ३ मुहूर्त आहेत. या तीन मुहूर्तांपैकी पहिला मुहूर्त हा रात्री ८:५२ ते १०:२९ पर्यंत आहे. त्यानंतरचा दुसरा मुहूर्त हा १०:२९ पासून ते १२:०५ पर्यंत आहे, त्यानंतर तिसरा मुहूर्त हा १२:०५ पासून ते १:४१ पर्यंत आहे.

या तिन्ही मुहूर्तांपैकी कोणत्याही एका मुहूर्तावर तुम्ही लक्ष्मी देवीची पूजा करू शकता. ही पूजा झाल्यानंतर लक्ष्मी देवीला दूध किंवा खीरचा प्रसाद दाखवला जातो. ही खीर किंवा दूध चंद्रप्रकाशात ठेवले जाते आणि नंतर, त्याचे सेवन केले जाते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button