वात्सल्य मदर अँड चाईल्ड केअर तर्फे ‘बाल विकास’ कार्यशाळेचे आयोजन
विविध अडचणींवर उपचार करण्यास डॉक्टरांना सहाय्यभूत ठरणारी कार्यशाळा
![Vatsalya, Mother and Child Care, 'Child Development', organizing workshops, Workshops on various difficulties, treatment, doctors, supportive,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/Vatsaly-780x470.png)
पिंपरी-चिंचवडः ऑटो क्लस्टर चिंचवड येथे रविवार दि. ६ ऑगस्ट 2023 रोजी सकाळी ९.30 ते दुपारी 2 या वेळेत डॉक्टरांसाठी ‘बालविकास’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनानंतर लहान मुलांच्या शारीरिक, मानसिक, शैक्षणिक, विकासात येणाऱ्या विविध अडचणी तसेच स्वमग्नतेचा प्रादुर्भाव व त्यावर सर्वोत्तमतम उपचार करण्यास डॉक्टरांना सहाय्यभूत ठरणारी ही कार्यशाळा असणार आहे.
कोरोना नंतर लहान मुलांच्या शारिरिक, मानसिक शौक्षणिक विकासात येणाऱ्या विविध अडचणी तसेच स्वमग्नतेचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्यावर सर्वोत्तम उपचार करण्यास डॉक्टरांना सहाय्यभूत ठरणारी ही कार्यशाळा ठरणार आहे.
या कार्यशाळेत या विषयांसंदर्भात विशेष अभ्यास असलेले तज्ज्ञ डॉक्टर्स मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा विनामूल्य असून, भविष्यात बालविकास संदर्भात उपयुक्त ठरेल. या कार्यशाळेत डॉ. अर्चना कवडे, डॉ. संदीप कवडे, डॉ. शंकर गोरे, डॉ. काश्मिरी बडबडे, डॉ. भाग्यश्री देवकर, डॉ. स्वाती भावे, इ.तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यशाळेचे संयोजक वात्सल्य हॉस्पिटल भोसरी यांनी केले आहे तर समन्यवयक डॉ. महेश शेटे हे आहेत. परिसरातील डॉक्टरांनी या कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन वात्सल्य हॉस्पिटलतर्फे डॉ. रोहिदास आष्टार यांनी केले आहे.