लक्षवेधी 13 वर्षाच्या मुलीवर यशस्वी हृदय प्रत्यारोपण
पिंपरी-चिंचवडमधील डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार
![A remarkable, successful, heart transplant on a 13-year-old girl,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/operation-hospital-780x470.jpg)
पिंपरी : पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 13 वर्षाच्या मुलीवर यशस्वी हृदय प्रत्यारोपण करण्यात आले. या रुग्णाला कार्डिओजेनिक शॉक लागल्याने तिचे हृदय निकामी होऊ लागले होते. 3 वर्षांपूर्वी एका शहरातील रुग्णालयात हृदयाचे झडप बदलण्याची शस्त्रक्रिया झाली होती. प्रकृती अधिक बिघडत असल्याने डी. वाय. पाटील मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर संबंधीत रुग्णावर उपचार करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
रुग्णालयामध्ये गेल्या 2 वर्षांपासून अवयव प्राप्तीच्या प्रतीक्षेत मुलीचे नातेवाईक होते. अवयव मिळाल्यानंतर तीला 2 सप्टेंबर 2023 रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णाच्या तपासणीच्या अहवालांचा अभ्यास केल्यावर, डॉक्टरांना रुग्णाच्या हृदयात संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यामुळे तिचे हृदय निकामी झाले होते. 15 पर्यंत हृदय कार्य करत होते. सामान्यपणे हृदय कार्य करण्याची गती 60 ते 70 टक्के असते. या वेळी हृदय प्रत्यारोपण करण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार अवयव प्राप्तीच्या प्रतीक्षा यादीमध्ये नाव नोंदविण्यात आले.
गुंतागुंतीची शस्त्रक्रिया झाल्याने 45 मिनिटांऐवजी तीन तास अवयव काढायला लागले. हे अवयव एका तरुण दात्याकडून प्राप्त झाले होते. त्यामुळे अवयव आकाराने सामान असल्याने रुग्णाला ते जुळून येण्यास मदत झाली. दहा तासानंतर शस्त्रक्रिया यशस्वी झाली. प्रत्यारोपणानंतर रुग्णाला वारंवावर निरीक्षण करणे आणि काळजी घेणे आवश्यक आहे. मुलगी लवकर बरी झाली आणि 18 दिवस निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर 20 सप्टेंबर 2023 रोजी घरी सोडण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.