breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडी

तुमचा राग ‘असा’ करा कमी, वाचा ३०-३०-३० चा नियम..

Reduce Your Anger : जगातील प्रत्येक मनुष्याला कधी ना कधी राग येतो. शीघ्रकोपी माणसाला यातून मोकळीक हवी असते, असे ओहायो विद्यापीठाचे कम्युनिकेशनचे प्रा.ब्रॅड बुशमन म्हणतात. एका संशोधनात दिसून आलं की, दोन तासांच्या रागामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका पाच पटीने वाढतो. रागाला आवर कसा घालावा, रागाचे सकारात्मक शक्तीमध्ये रूपांतर कसे करावे हे माहीत नसते. अमेरिकेतील ‘ब्लॅक लाइव्ह मॅटर्स’ यांसारख्या मोहिमा संतापातूनच निर्माण झाल्या.

रागावर कसे नियंत्रण ठेवता येईल, यासाठी जाणून घेऊया…

दूर जा : रागविषयक तज्ज्ञ टोनी फियोरे म्हणतात की, माणसाला राग येत असता एखाद्यास अडवले तर संतापात भर पडते. उलट अशा परिस्थितीत काही काळ दूर राहावे. त्यानंतर शांतपणे आपले मत व्यक्त करावे.

हेही वाचा – ‘मी मुख्यमंत्री होण्याची कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण व्हावी’; नाना पटोले यांचं विधान चर्चेत 

लक्ष विचलित करा : रागाच्या भरात मागे हटणे कठीण आहे, राग व्यवस्थापन तज्ज्ञ लॉरा मॉस म्हणतात, त्यामुळे ३०-३०-३० नियम पाळा. रागातून सावरण्यासाठी ३० सेकंद घ्या आणि त्या ठिकाणाहून दूर जा. जुना अल्बम ३० सेकंद पाहणे, खरेदीची यादी बनवणे यासारख्या गोष्टी करा, त्यामुळे लक्ष वळते. शेवटच्या ३० सेकंदांत आपले म्हणणे ठामपणे मांडण्यासाठी प्रयत्न करा.

रागाचे निरीक्षण : आठवडाभर रागावर लक्ष ठेवा. म्हणजे आपणास कधी आणि का राग आला, कशामुळे अस्वस्थ झालाे. उदा : ट्रेन तिकीट रांगेत किंवा ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे राग आला असेल, तर आपण ३० सेकंदांचा नियम पाळला आहे का? मदत झाली का? या ट्रॅकिंगमधून कारणे शोधा म्हणजे उपाय सुचेल.

तार्किक चर्चा : वाद होतो तेव्हा कमी आवाजात तर्कबुद्धीने चर्चा करा. डॉ ज्युलिया बॉम म्हणतात, समोरच्या व्यक्तीशी बोलताना स्वत:च्या स्वाभिमानाचीही काळजी घ्या. राग अनावर होत असल्यास शांत होईपर्यंत थांबा. दीर्घ श्वास घेऊन, लक्ष वळवून ते कमी करता येते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button