“…त्यानंतरच राज्यातल्या शाळांबाबत पुनर्विचार करू”; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिले महत्त्वाचे संकेत
![Recruitment of eight and a half thousand posts for clerks, nurses and ward boys, announced by the Minister of Health](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/Rajesh-Tope-4-1.jpg)
मुंबई |
ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्य सरकारनं शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला, तर दुसरीकडे काही शिक्षण तज्ज्ञांसह अनेकांनी शाळा सुरु करण्याची मागणी केली. या दोन वेगवेगळ्या मतप्रवाहांवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी मोठं विधान केलं आहे. शाळा पुन्हा सुरू होणार की नाही, कधी सुरू होणार याबद्दल टोपे यांनी भाष्य केलं आहे.
जालन्यात पत्रकारांशी संवाद साधताना टोपे म्हणाले, मला असं वाटतं, एकंदर रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचं प्रमाण कमी आहे, मुलांना करोनाची लागण होण्याचं प्रमाण कमी आहे. याबद्दल कॅबिनेट बैठकीतही भरपूर चर्चा झाली आणि या चर्चेतून एवढंच ठरलं की आता एक १०-१५ दिवस शाळा बंदच राहतील. तोपर्यंत राज्यातली परिस्थिती पाहिली जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून विचार करून आणि १५ दिवसांनंतरची परिस्थिती पाहून शाळा सुरू करायच्या की बंद याविषयीचा निर्णय घेण्यात येईल.