breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

“…आणि ऑक्सिजनची व्यवस्था झाली!”; फडणवीसांनी केलं ट्विट…

मुंबई |

राज्यात दिवसेंदिवस करोना संसर्ग वाढत असून, आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. रूग्णलयांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, रेमडेसिविर व लस तुटवडा निर्माण होत आहे. यामुळे करोनाबाधितांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार व प्रशासकीय यंत्रणासंह विरोधी पक्षांकडून देखील आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, आज नागपूरसाठी ३८ मेट्रीक टन ऑक्सिजन घेऊन दोन टँकर सकाळी  पोहोचले आहेत. त्यातून शासकीय आणि खासगी रूग्णालये मिळून चार ठिकाणी ४१८० जम्बो सिलेंडर्स भरले जातील. यामधून सुमारे तीन हजाराहून अधिक ऑक्सिजन बेड्सची गरज भागविली जाणार आहे.

हे टँकर आज सकाळी नागपुरमधील बुटीबोरी येथे दाखल झाले. याबद्दल जायसवाल निकोचे अध्यक्ष बसंतलाल शॉ आणि सहप्रबंध संचालक रमेश जायसवाल यांचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले आहेत. हे दोघेही मूळचे नागपूरकर असल्याने त्यांनी पुढाकार घेत एक दिवसाआड एक टँकर नागपूरला देण्याच्या देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विनंतीला मान दिला होता. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी आणि त्यांचे बोलणे करून दिले होते. २१ एप्रिल रोजी हा समन्वय घडवून दिल्यानंतर आज दोन टँकर्स नागपुरात पोहोचले आहेत. सिलतारा, रायपूर येथील जायसवाल निको प्रा. लि. या इंटिग्रेडेट प्रकल्पातून हा ऑक्सिजनसाठा नागपुरात आला. ऑक्सिजन नागपुरात आणण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था सुद्धा निकोनेच केली. यामुळे आता मोठा दिलासा नागपूरला मिळणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button