Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

मुंबई l प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत स्वतः शरद पवार यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे.

मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या देशभर पुन्हा वाढत आहे. त्यातच कोरोनाचा उत्परिवर्तित विषाणू ओमायक्रॉनचा देखील फैलाव वाढत आहे. मागील काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button