breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र
N-95 असो किंवा कोणताही मास्क, ठरलेल्या किमतीतच विकावे लागतील, आरोग्यमंत्र्यांनी ठणकावलं
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/76246165.jpg)
सांगली: ‘एन-95’ मास्क किंवा अन्य कोणतेही मास्क एका ठराविक किमतीतच विकावे लागणार आहेत. याबाबत 4 दिवसात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात अद्यावत कोव्हिड रुग्णालयाचे उद्घाटन आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे.
इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात 40 बेडचे हे अद्यावत कोविड रुग्णालय उभारण्यात आलेले आहे. वाळवा आणि शिराळा तालुक्यातून 50 ते 90 किलोमीटर प्रवास करुन यापूर्वी रुग्णांना सांगली आणि मिरजेतील शासकीय कोव्हिड रुग्णालयामध्ये यावे लागत होते. मात्र, इस्लामपूरमधील नवीन कोव्हिड रुग्णालयामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे. टाटा ट्रस्टच्या वतीने 10 कोटी रुपये खर्चून हे अद्यावत रुग्णालय उभारण्यात आलेले आहेत.