breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशात तीन कोटींहून अधिक करोनाबाधित

  • ५०८४८ नवे रुग्ण, १३५८ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली | 

देशात गेल्या ५० दिवसांत एक कोटी लोकांना करोनाची लागण झाल्याने बाधितांच्या संख्येने तीन कोटींचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या एका दिवसात आणखी ५० हजार ८४८ जणांना करोनाची लागण झाल्याने बाधितांची एकूण संख्या तीन कोटी २८ हजार ७०९ वर पोहोचली आहे, तर १३५८ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या तीन लाख ९० हजार ६६० वर पोहोचली आहे, असे बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

देशातील उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत आणखी घट झाली असून ती सहा लाख ४३ हजार १९४ वर पोहोचली आहे, हे प्रमाण एकूण बाधितांच्या २.१४ टक्के इतके आहे. करोनातून बरे होण्याच्या प्रमाणात सुधारणा झाली असून ते ९६.५६ टक्क्यांवर पोहोचले आहे. गेल्या एका दिवसात १३५८ जणांचा मृत्यू झाला त्यापैकी ४८२ जण महाराष्ट्रातील आहेत तर एकूण तीन लाख ९० हजार ६६० जणांचा मृत्यू झाला त्यापैकी एक लाख १८ हजार ७९५ जण महाराष्ट्रातील आहेत. मंगळवारी एका दिवसात १९ लाख एक हजार ५६ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या तर आतापर्यंत देशात एकूण ३९ कोटी ५९ लाख ७३ हजार १९८ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत, असेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने मंगळवारी सांगण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button