आरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्य सरकारची खावटी अनुदान योजना पुन्हा सुरु

अहमदनगर: महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर सुरुवात चांगली झाली. खूप चांगल्या योजना, संकल्पना राबविण्याचे निश्चित केले होते. पण करोनामुळे याला मर्यादा आल्या होत्या. करोनासंकट वाढले आहे. यामुळे जगण्यावर निर्बंध आले, परिणामी, अर्थचक्र मंदावले. याचे दुष्परिणाम शहरांबरोबरच ग्रामीण आणि आदिवासी भागावरही होत आहेत. आदिवासी कुटुंबाना दिलासा देण्यासाठी खावटी अनुदान योजना पुन्हा सुरू केली आहे. काल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, राजूर यांच्या अंतर्गत नगर तालुक्यातील आढाववाडी येथे महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या खावटी अनुदान योजनेअंतर्गत अन्नधान्य किट वितरणाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राजक्त तनपुरे यांनी केले.

 

महाराष्ट्र शासनाची अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांसाठीची खावटी अनुदान योजना काही काळासाठी बंद होती. ही योजना कोरोनाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने सुरू करून बांधवांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.या योजनेअंतर्गत २००० रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले तसेच  प्रत्येकी २००० रुपयांचे अन्नधान्य किट काल लाभार्थ्यांना वाटले.

 

राज्य शासनाने शेतकरी आर्थीकदृष्टया दुर्बल व अनुसुचित जमातिच्या कुंटूबियांना आर्थीकसाह्य देण्याची सवेदनशिल भुमिका घेतलेली आहे,त्याचाच एक भाग म्हणुन दर वर्षी पावसाळ्यात राहे जून ते सप्टेम्बर या कालावधीमध्ये रोजगार उपलब्ध होत नाही म्हणुन आर्थीक विवंचनेतुन अनुसुचित जमातिच्या कुंटूबियाची उपासमार होउ नये म्हणुन सन,१९७८ पासुन खावटी कर्ज योजना राज्य शासनाकडुन सुरु खरण्यात आली,सदर योजना महाराष्ट्रराज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित.नाशिक यांचे मार्फत राबवली जाते असे.

 

या उद्घघाटन प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य गोविंद आण्णा मोकाटे, संदेश कार्ले, शरद झोडगे, तसेच झिने सर, दानी साहेब, सेना तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, पिंपळगाव माळवीचे सरपंच प्रभुणे, जेऊरचे सरपंच मगर, खोसपुरी गावाचे सरपंच हरिभाऊ हारेर, राष्ट्रवादीचे नेते रोहिदास पाटील कर्डिले, केकतीचे सरपंच भालसिंग, १२ बाभळीचे सरपंच मोरे, डोंगरगावचे सरपंच माटे, बबनराव पटारे, आदिवासी नेते बाबासाहेब पवार, बाळासाहेब भीटे, डॉ. राम कदम, साखरे, रामेश्वर निमसे, पोखर्डी सरपंचरामेश्वर निमसे , अमोल जाधव, ऍड. भगत, आणि व इतर ग्रामपंचायत सदस्य , ग्रामस्थ उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button