आरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिखलीत डेंग्यूच्या रूग्णांत वाढ, प्रशासनाचे दुर्लक्ष

परिसरात उपाययोजना करण्याची मागणी
चिखली | परिसरात डेंग्यूचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. प्रशासनाकडून जनजागृती, उपाययोजना करणे अपेक्षित असताना, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणांचा सर्व्हे करून, धुरीकरण आणि फवारणी करावी. तसेच डेंग्यूसदृश्य ठिकाणांचा सर्व्हे केल्यानंतर संबधिंतांवर कारवाई करावी अशी मागणी चिखली-मोशी हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष विकास साने यांनी आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.
चिखली, कुदळवाडी, जाधववाडी परिसरात भंगार व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आहेत. स्क्रपमध्ये असलेल्या टायरमध्ये, नारळाच्या करंट्या, साचलेली डबकी तसेच काही घरांमध्ये अनेक दिवसांपासून पाणी भरून ठेवलेले असते, अशा ठिकाणचा सर्व्हे होणे गरजेचे आहे. मात्र आरोग्य आणि वैद्यकीय विभागांकडून कुठलीही कारवाई, अथवा उपाययोजना होताना दिसून, येत नाहीत. परिसरात डेंग्यूच्या रूग्णांत झालेल्या वाढीमुळे रूग्णालयात गर्दी वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी लवकरात-लवकर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती घेताना, डॉ. सुनीता साळवे म्हणाल्या, प्रभागांचा सर्व्हे कऱण्यासाठी मागील पंधरा दिवसांपासून सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य आणि वैद्यकीय विभागाच्या वतीने सर्व्हे सुरु आहे. चिखली परिसरात पुन्हा एखदा धुरीकरण, फवारणी करण्याच्या सूचना दिल्या जातील.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button