TOP Newsआरोग्यताज्या घडामोडी

डागी केळी खाणं कितपत सुरक्षित, खाण्याची योग्य वेळ काय? जाणून घ्या तुम्हाला माहिती नसलेल्या अनेक गोष्टी

केळी आरोग्यासाठी उत्तम मानली जाते. आज बाजारात अनेक प्रकारची केळी मिळतात. तुम्हाला माहिती आहे केळीची एकूण किती प्रजाती आहेत ते. जगभरात तब्बल 1 हजार प्रजाती आहेत तर भारतात 10 पेक्षा जास्त केळीच्या प्रजाती प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातील जळगाव हे केळीचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. आपण बाजारात गेलो की छान पिवळी केळी विकत घेतो. अनेक वेळा आपण पाहिलं आहे की, केळीला तपकिरी आणि काळे डाग पडलेली दिसतात. अशी केळी आपल्याला घ्यायची इच्छा होतं नाही. शिवाय केळी विकत आणल्यावर घरात इतर फळांसोबत किंवा काही दिवसांनी केळीवर तपकिरी आणि काळे डाग पडतात. मग आपण म्हणतो अरे खाऊन घ्या ती केळी काळी पडतं चालली आहे. खराब होत आहे, ती केळी. आपल्या सगळ्यांना अशी काळी पडलेली तपकिरी केळी खायला आवडतं नाहीत. पण आम्हाला सांगा केळीवर असे डाग का दिसतात आणि अशी केळी आरोग्यासाठी चांगली आहे का? चला या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेऊयात.

केळी तपकिरी का होतात?

तुम्हाला माहिती आहे का, की जगभरात 50 दशलक्ष टन केळी तपकिरी रंगाचे ठसे असल्यामुळे फेकल्या जातात. फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी (science revealed secret) नुकत्याच केलेल्या संशोधनात केळीवरील या काळा आणि तपकिरी रंगाबद्दल गुपित उघड केलं आहे. शास्त्राज्ञनुसार केळीच्या सालीमध्ये इथिलीन गॅस असतो. त्यात असलेले क्लोरोफिल ते मोडून टाकते. केळीच्या हिरवटपणासाठी क्लोरोफिल जबाबदार आहे. केळीच्या सालीमध्ये इथिलीन वायूचे प्रमाण वाढतं आणि ते वातावरणातील ऑक्सिजनशी प्रतिक्रिया देत असल्याने त्याचा हिरवापणा कमी होतो. यासोबतच यामध्ये असलेल्या स्टार्चचे साखरेत रूपांतर होते. त्यामुळे केळीचा गोडवा वाढतो.

केळी कधी पिकू लागतात?

जेव्हा केळीमधून फक्त गॅस निघतो आणि त्यामुळेच केळी पिकू लागतात. त्यामुळे त्यात गोडवा वाढतो आणि काही दिवसांनी ते अधिक पिकते. केळीसोबत ठेवलेल्या बहुतांश फळांवर इथिलीन वायूचा परिणाम दिसून येतो. उदाहरणार्थ, सफरचंद केळीसोबत ठेवल्यानंतर काही तासांनंतर ते पिकलेले दिसतात आणि ते मऊ होऊ लागतात. त्याच वेळी, संत्री, लिंबू आणि बेरी ही अशी फळे आहेत ज्यांना इथेन गॅसचा प्रभाव पडत नाही. तसंच तुम्ही जर केळीच्या आजूबाजूला दुसरं फळ ठेवलेत, तर ते केळीमुळे पिकू लागतात. त्यामुळे शक्यतो इतर फळांसोबत केळी ठेऊ नका. 

तपकिरी केळी खाणे सुरक्षित आहे का?

तुमची केळी किती तपकिरी आहे यावर हे सर्व अवलंबून आहे. सरतेशेवटी, जोपर्यंत तुमची केळी बुरशीची होत नाही आणि तुम्ही साल काढता तेव्हा ती पातळ किंवा जास्त मऊ आणि स्क्विश होत नाही, तपकिरी केळी खाणे सुरक्षित असते.

केळी खाण्याची योग्य वेळ ?

1. एका दिवसात एक किंवा दोनच केळी खावीत. 

2. केळे हे एकदम सकाळी उपाशीपोटी किंवा रात्रीच्या वेळी खाऊ नये, कारण यामुळे कफाचा त्रास होण्याची शक्यता असते. 

3. सकाळी उपाशीपोटी केळी खाल्ल्यामुळे पोटात गॅस होणे, पोटदुखी, उलटी, अतिसार यासारखे त्रास होऊ शकतात. 

4. केळी खाल्ल्याने मुलांना सर्दी किंवा कफाचा त्रास होऊ नये यासाठी मुलांना केळे हे दुपारच्या वेळेसच खाण्यास द्यावे. 

केळी कधीही अशाप्रकारे खाऊ नये

आयुर्वेदानुसार दूध आणि केळी कधी एकत्र खाऊ नये असं सांगण्यात आलं आहे. दूध आणि केळी एकत्र करुन खाणे हे विरुद्ध आहार मानले जाते. जास्त पिकलेली केळी खाऊ नयेत. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button