आरोग्यताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ योजनेचा उत्साहात शुभारंभ

चिंचवड येथील तालेरा रुग्णालयामध्ये नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने सुरुवात

पिंपरी-चिंचवडः राज्य शासनाच्या आयुष्यमान भव मोहिमे अंतर्गत “निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे” या योजनेची सुरुवात चिंचवड येथील तालेरा रुग्णालयामध्ये नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी तालेरा रुग्णालय प्रमुख तथा ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता तिरुमनी, वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोरकुमार हांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकुमार मोरे तसेच वळसे सिस्टर, गोंदे सिस्टर, इतर स्टाफ व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या इतर सर्व रुग्णालयाप्रमाणे चिंचवड येथील तालेरा रुग्णालयामध्ये ‘३१ डिसेंबर २०२३’ पर्यंत दर शनिवारी १८ वर्षे वयावरील सर्व पुरुष नागरिकांना राज्य शासनाच्या आयुष्यमान भव मोहिमे अंतर्गत “निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे” या योजनेअंतर्गत आरोग्य तपासणी तसेच उपचार सेवा पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे.

सदर कार्यक्रमामध्ये तालेरा रुग्णालयामध्ये जनरल, स्त्रीरोग, बालरोग, दंत रोग, त्वचा विकार या बाबत तज्ज्ञ डॉक्टरांकडून सेवा दिल्या जातात. व मोफत आयुष्यमान भारत कार्ड, तसेच पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आयुष्यमान भारत अंतर्गत ५ लाखाच्या विमाचे कार्ड देखील काढून दिले जाते. याची माहिती देण्यात आली. तसेच याप्रसंगी नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांनी या सर्व सेवांचा लाभ घेण्याचे चिंचवडकर नागरिकांना आवाहन केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button