वाढता वाढे ! 24 तासांत 45,355 नवे रुग्ण, 4 लाखांच्या उंबरठ्यावर ॲक्टिव्ह रुग्णसंख्या
![Growing up! 45,355 new patients in 24 hours, active patients on the threshold of 4 lakhs](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/383720-corona-logo.jpg)
पिंपरी चिंचवड | केरळमध्ये कोरोना रुग्णांची वाढ अधिक होत असल्याने देशात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर रुग्णवाढ दिसून येत आहे. देशात मागील 24 तासांत 45 हजार 355 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून, त्यापैकी केरळमध्ये 32 हजार 097 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या पुन्हा एकदा चार लाखांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली आहे.आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 29 लाख 03 हजार 289 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 20 लाख 63 हजार 616 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 34 हजार 791 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
देशात सध्या 3 लाख 99 हजार 778 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 366 रुग्णांचा मृत्यू झाला आहे असून, भारतात आजवर 4 लाख 39 हजार 895 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.33 टक्के एवढा आहे. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 97.47 टक्के एवढा झाला आहे.आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 52 कोटी 65 लाख 35 हजार 068 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 16 लाख 66 हजार 334 नमूने तपासण्यात आले आहेत.
लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात आत्तापर्यंत देशात 67 कोटी 09 लाख 59 हजार 968 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 64 लाख 70 हजार 901 नागरिकांना लस टोचण्यात आली आहे.