पुढील काही वर्ष आपल्याला मास्क घालूनच फिरावं लागेल; तज्ज्ञांचा इशारा
![For the next few years, you'll have to walk around wearing a mask; Expert warning](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/sanitizer-mask1_istock.jpg)
नवी दिल्ली |
जगभरामध्ये पुन्हा एकदा करोनाबाधितांची संख्या दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. अनेक देशांमध्ये करोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जातेय. मात्र एकीकडे लसीकरण सुरु असल्याने करोनावर आपण नक्की मात करु असा दावाही काही तज्ज्ञांकडून आत्मविश्वासाने केला जातोय. मात्र लसीकरणानंतरही मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. असं असतानाच आता इंग्लंडमधील नागरी आरोग्य विभागाच्या लसीकरण विभागाच्या प्रमुख असणाऱ्या डॉ. मेरी रॅमसे यांनी एक मोठा दावा केलाय.
पुढील काही वर्षांसाठी आपल्या सर्वांनाच सोशल डिस्टन्सिंग आणि तोंडावर मास्क घालून फिरावं लागेल, असं डॉ. रॅमसे म्हणल्या आहेत. डॉ. रॅमसे यांनी जगभरातील लोकांना आता काही प्रमाणात निर्बंधांची सवय लावणं गरजेचं आहे असंही म्हटलं आहे. पुढील काही वर्षांसाठी आपल्याला हे नियम पाळावे लागणार आहेत. या निर्बंधांच्या आधाराचे आपल्याला अर्थव्यवस्थेला चालना द्यावी लागणार आहे. सरकारलाही कोणतेही निर्बंध हटवण्याआधी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे, असा इशाराही रॅमसे यांनी दिल्याचं म्हटलं आहे.
वाचा- केंद्र सरकारच बरखास्त करायला पाहिजे- शिवसेना खासदार संजय राऊत