breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडी

दिवाळीत आरोग्‍य जपण्यासाठी ‘या’ टिप्‍स फॉलो करा

Health Tips : दिवाळी सणात सर्वांचीच एकच धावपळ उडते. फटाक्‍यांचे प्रदूषण असो की फराळ पदार्थांचे अतिखाणं याचा आरोग्‍यावर परिणाम होतो. तर जाणून घेवूया दिवाळीत आरोग्‍याची काळजी कशी घ्‍यायची..

अति खाणे टाळा : दिवाळीत आहारात चविष्ट फराळाबरोबर गोड पदार्थांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश होतो. . या आनंदोत्‍सवात नकळत अति खाणे होते. त्‍यामुळे पोटाच्‍या समस्या उद्भवू शकतात. पित्त विकारात वाढ होउ शकते. घराबाहेरचे खाणे आणि अति खाण्यामुळे पोट बिघडते. त्‍यामुळे दिवाळीत अति खाणे टाळा. तसेच आहारात पालेभाज्या व फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा.

पुरेशी झोप घ्‍या : दिवाळीनिमित्त सर्वजण एकत्र येतात. त्‍यामुळे रात्री उशिरापर्यंत जागरण होते. मात्र पुरेशी विश्रांती घेतली नाही तर याचा आरोग्‍यावर परिणाम होतो. अपुर्‍या झोपेमुळे तुमचा मूडही बदलू शकतो. त्‍यामुळे पुरेशी विश्रांती घेणे याला प्राधान्‍य द्‍या. चांगला मूड आणि आरोग्यासाठी ६-८ तास झोप आवश्‍यक घ्‍या.

हेही वाचा – मनोज जरांगे पाटलांचं मराठा समाजाला नवं आवाहन; म्हणाले..

महिलांनी अतिश्रम टाळावे : दिवाळीत महिलांची धावपळ वाढते. त्यामुळे अचानक शारीरिक हालचाली वाढतात. तसेच अति तळलेले पदार्थही खाण्‍यामध्‍ये येतात. याचा परिणाम शरीरावर होतो. त्‍यामुळे दिवाळीत महिलांनी अतिश्रम टाळावे. अतिश्रम टाळण्‍याबरोबरच स्वतःला हायड्रेटेड ठेवत सर्वांनीच पुरेसे पाणी पिणे हितकारक ठरते.

वायू प्रदूषण करु नका : दिवाळीमध्ये फटाके आणि मोठ्‍या आवाजातील संगीतामुळे ध्‍वनी आणि वायू प्रदूषण वाढते. त्‍यामुळे अति आवाजाचे फटाके आणि संगीताचा दणदणाट कमी करा आणि दिवाळी आरोग्‍यदायी करा.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button