आरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्रात पाच कोटी नागरिकांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

पुणे |  महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाला वेग देण्यात आला आहे. सोमवारी (दि.16) सायंकाळी सहापर्यंत 6 लाख 8 हजार नागरिकांना लस देण्यात आली. त्यामुळे राज्यातील लसीकरणाचा टप्पा पाच कोटींवर गेला आहे. देशात उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्राने ही विक्रमी कामगिरी केली आहे.

14 ऑगस्ट रोजी राज्यात एकाच दिवशी 9 लाख 64 हजार 460 नागरिकांना लस देऊन महाराष्ट्राने आतापर्यंतची सर्वाधिक संख्या नोंदविली होती. सोमवारी झालेल्या लसीकरण सत्रांमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत 6 लाख 8 हजार नागरिकांचे लसीकरण झाले. रात्री उशिरापर्यंत त्यात वाढ होण्याची शक्यता आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी वर्तविली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button