आरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

भोसरीत मोफत दंत तपासणी शिबिरात 500 विद्यार्थ्यांची तपासणी

भाजपा आणि कविता भोंगाळे युवा मंच तर्फे उपक्रम

पिंपरी : भोसरी येथे भाजपाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महिला मोर्चा व कविता भोंगाळे युवा मंचच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये 500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी करण्यात आली. तसेच योग्य उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील डेंटल कॉलेज व हॉस्पीटलच्या प्रशिक्षित तज्ञांकडून ही तपासणी करण्यात आली.

यावेळी भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस कविता भोंगाळे म्हणाल्या की, बदलत्या आधुनिक जीवनशैली व जंक फूडमुळे लहान मुलांचे दात खराब होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. त्यामुळे योग्य त्या वेळेला निदान होवून मुलांना अशा जंक फुडपासून परावृत्त केल्यास त्यांचे दात निरोगी राहतील. याच सामाजिक भावनेने हे शिबिर आयोजित केलेले आहे. आगामी काळात भोसरी, दिघी परिसरातील सर्व शालेय विद्यार्थीनीची दंत तपासणी कविता भोंगाळे युवा मंचच्या माध्यमातून मोफत केली जाणार आहे. अशा शिबिरांचा पालकांनी शाळांनी लाभ घेत आपल्या विद्यार्थांची दंत तपासणी करून घ्यावी, असे आवाहान कविता भोंगाळे यांनी केले.

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. डी. वाय. पाटील डेंटल कॉलेज व हॉस्पीटलचे डॉ. तृप्ती जाधव, डॉ. स्वरांजली रामकर, डॉ. स्वमन खरात आदींनी मेहनत घेतली. तसेच यावेळी श्रमजीवी विद्यालयाचे मुख्याध्यापक राक्षे माध्य प्रभारी मुख्याध्यापक निवडुंगे, सर्व शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीकांत राहणे यांनी सूत्रसंचालन केले. राहुल ताकमोडे यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button