Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी

सकाळी रिकाम्यापोटी दूध, साखरेशिवाय प्या ब्लॅक कॉफी, आरोग्याच्या या समस्या होतील कमी

Health : आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्या भारतात चहा प्रेमींची कमतरता नाही. पण त्यासोबत कॉफी प्रेमी देखील बरेचजण आहेत. खरं तर आपल्यापैकी बरेच जण दिवसाची सुरूवात गरम कॉफीने करतात. तसेच निरोगी आरोग्यासाठी ब्लॅक कॉफी ही अनेकांमध्ये आवडते पेयं बनलेलं आहे. कारण ब्लॅक कॉफी केवळ ऊर्जा प्रदान करते असे नाही, तर तिचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. तुम्ही ब्लॅक कॉफी पीत नसाल तर ती पिण्यास सुरुवात करा, कारण यामुळे आळस आणि लठ्ठपणा जलद गतीने कमी होतो. चला जाणून घेऊया की ब्लॅक कॉफी सेवन करणे कोणासाठी फायदेशीर ठरेल.

ब्लॅक कॉफीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते, कारण ब्लॅक कॉफीमध्ये दूध, साखर यांचा वापर केला जात नाही. तर स्ट्राँग आणि चवीसाठी ओळखले जाणारी या कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असल्याने आपल्या शरीरात बराच वेळ ऊर्जा टिकून राहते. यासोबत हे लक्षात घेण्यासारखे आहे की ब्लॅक कॉफी तिची नैसर्गिक चव टिकवून ठेवते आणि त्यात कोणतेही गोड पदार्थ नसतात. म्हणूनच ज्यांना गोड कॉफी किंवा चहा आवडत नाही त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

हेही वाचा –  ‘धुरंधरची धुंद!’ ओपनिंग डेला आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट, किती कोटी कमावले?

ब्लॅक कॉफी पिण्याचे फायदे-

  1. वजन कमी करणे –

काळ्या कॉफीचे फायदे हे चवीपलीकडे आहेत. कारण यामध्ये कॅलरीज कमी असून अँटिऑक्सिडंट्स भरपूर आहे. त्यामुळे ब्लॅक कॉफी प्यायल्याने चयापचय वाढवता येतो, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

  1. हॅप्पी हार्मोन्स –

ब्लॅक कॉफी हृदयाच्या आरोग्यासाठी चांगली मानली जाते. ती प्यायल्याने मूड देखील सुधारतो आणि कामावर लक्ष केंद्रित होते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की ब्लॅक कॉफीमुळे डोपामाइन आणि सेरोटोनिन सारखे न्यूरोट्रांसमीटर वाढतात. हे न्यूरोट्रांसमीटर आनंदाच्या भावनांशी संबंधित आहेत, म्हणजेच ब्लॅक कॉफीमुळे “हॅप्पी हार्मोन्स” वाढतो.

  1. ऊर्जा पातळी –

ब्लॅक कॉफी प्यायल्याने उर्जेची पातळी वाढते आणि थकवा कमी होतो. तुम्हाला जर थकवा जाणवत असेल, तर ब्लॅक कॉफी प्यायल्याने ऊर्जा मिळू शकते.

  1. मधुमेह –

ब्लॅक कॉफी प्यायल्याने टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की दररोज एक कप ब्लॅक कॉफी प्यायल्याने हा धोका 7% पर्यंत कमी होऊ शकतो. क्लोरोजेनिक अॅसिडसारखे अँटिऑक्सिडंट्स इन्सुलिन संवेदनशीलता आणि ग्लुकोज चयापचय सुधारतात, रक्तातील साखर नियंत्रित ठेवतात.

  1. यकृत –

दररोज 3-4 कप ब्लॅक कॉफी प्यायल्याने यकृताचे आरोग्य सुधारते. ते यकृतातील फॅटचे संचय कमी करू शकते आणि हानिकारक एंजाइम्स (ALT/AST) चे प्रमाण कमी करू शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button