breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

#डॉ. गणेश शेळके आत्महत्याप्रकरण: पाथर्डीचे तालुका आरोग्याधिकारी सक्तीच्या रजेवर

नगर |

करंजी (ता. पाथर्डी) येथील आरोग्य उपकेंद्रातील समुदाय आरोग्याधिकारी डॉ. गणेश शेळके आत्महत्या प्रकरणात तालुका आरोग्याधिकारी डॉ. भगवान दराडे यांना पोलिस चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे तसेच यासंदर्भात पाथर्डीचे पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी जाबजबाब घेऊन तपासाला सुरुवात केली आहे. दरम्यान डॉ. शेळके यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळगावी बहिरवाडी (ता. नेवासे) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून डॉ. गणेश शेळके यांनी काल, बुधवारी दुपारी करंजी उपकेंद्रात, लसीकरण सुरू असतानाच गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत, तालुका आरोग्याधिकारी डॉ. दराडे, तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे.

यासंदर्भात बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, पोलीस याप्रकरणाची चौकशी करत आहेत. चौकशी होईपर्यंत तालुका आरोग्याधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाशी तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांचा थेट काही संबंध आहे का, याचीही चौकशी पोलीस करतील. करोना संसर्गाच्या उपाययोजनांसंदर्भात आरोग्याधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. वरिष्ठ अधिकारी रोज ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग‘मार्फत आढावा घेत असतात. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा काही संबंध असेल तर पोलिस त्याचा तपास करतील.

जिल्हा परिषदेचे सीईओ राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले की, समुदाय आरोग्याधिकारी म्हणून गेल्या वर्षी जिल्‘ातील पाचशे उपकेंद्रांवर नियुक्त करण्यात आल्या. त्यांच्याकडे संसर्ग नसलेल्या आजारांच्या तपासणीचे काम देण्यात आले होते. आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत ते परीक्षा उत्तीर्ण झाले होते. त्यांना २५ हजार रुपये मानधन व उद्दिष्ट पूर्ण केल्यानुसार जास्तीत जास्त १५ हजार रुपये मानधन देण्यात येते. करोना संसर्ग वाढल्यामुळे करोना काळजी केंद्रांवर २४ तास सेवा देण्याची आवश्यकता भासू लागल्याने समुदाय आरोग्याधिकाऱ्यांची या केंद्रांवर नियुक्त्या करण्यात आल्या. जिल्‘ातील अनेक समुदाय आरोग्याधिकाऱ्यांचे वेतन मेपर्यंत दिले गेले आहे. परंतु पाथर्डी व श्रीरामपूर तालुक्यातील वेतन देणे बाकी आहे.

  • समुदाय आरोग्याधिकारी संघटनेचे आंदोलन

डॉ. गणेश शेळके यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी समुदाय आरोग्याधिकारी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले, मागण्यांसाठी घोषणाही दिल्या. संघटनेचे पदाधिकारी डॉ. शैलेश पवार, डॉ. ऋषिकेश अभंग, डॉ. नीलेश कोल्हे, डॉ. विशाल काळे, डॉ. रेणुका रुपटक्के यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री मुश्रीफ यांची भेट घेऊन निवेदन दिले.

डॉ. शेळके यांना तालुका आरोग्याधिकारी हेतुपुरस्सर त्रास देत असल्याने ते तणावात होते. त्यांचे गेल्या ३ महिन्यांचे मानधन दिले गेले नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी स्वत:चे आयुष्य संपवले. तालुका आरोग्याधिकारी, तहसीलदार व जिल्हाधिकारी हे करोना महामारीत कर्मचाऱ्यांच्या जीवाची कोणतीही कदर न करता वाटेल ते कामाचे उद्दिष्ट देऊन कर्मचाऱ्यांना वैयक्तिकरीत्या लक्ष करून त्यांचा जीव जाण्यास परावृत्त करत आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button