‘न खाई भोगी तो सदा रोगी’, भोगी का साजरी करतात?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Untitled-design-24-3-780x470.jpg)
sankranti special : ‘न खाई भोगी, तो सदा रोगी’ हे वाक्य आपण अनेकदा ऐकत आलो आहे. नववर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकरसंक्रात. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा दिवस म्हणजे भोगी. या सणाच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो.
यादिवशी इंद्र देवाची आठवण काढली जाते. इंद्र देवाने आपल्या धर्तीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती. ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुती दिली जाते.
हेही वाचा – काँग्रेसला मोठा धक्का, मिलिंद देवरा यांचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा, शिंदे गटात प्रवेश
या सणाला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून तयार केलेली भोगीची भाजी बनवतात. यात प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, फ्लॉवर आदी भाज्या वापरून भाजी बनवली जाते. सोबतच तीळ लावलेली बाजरीची भाकरी बनवली जाते. या दिवशी सूर्याची व घरातील देवांची पूजा करून नैवद्य दाखवला जातो. हि भोगी साजरी करण्यामागची कहाणी आहे.