Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Covid-19: ‘डीआरडीओ’कडून तीन महिन्यांत ३०० प्रकल्पांची निर्मिती

नवी दिल्ली |

संरक्षण संशोधन व विकास संस्था म्हणजे डीआरडीओ येत्या तीन महिन्यांत पाचशे वैद्यकीय प्राणवायू प्रकल्प सुरू करणार आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. या प्रकल्पांसाठी पीएम केअर निधीचा वापर करण्यात येणार आहे. वैद्यकीय प्राणवायू प्रकल्प हे संरक्षण संशोधन व विकास संस्था तयार करणार असून हे तंत्रज्ञान तेजस या हलक्या लढाऊ विमानासाठी तयार करण्यात आले होते. त्याचाच वापर प्राणवायू तयार करण्यासाठी केला जाणार आहे. डीआरडीओच्या निवेदनात म्हटले आहे की, वैद्यकीय प्राणवायू प्रकल्प तंत्रज्ञान बेंगळूरुच्या टाटा अ‍ॅडव्हान्सड सिस्टीम्स लि. व कोईंबतूरच्या ट्रायडेंट न्यूमॅटिक्स यांना हस्तांतरीत करण्यात येणार असून या दोन कंपन्या ३८० प्राणवायू प्रकल्प निर्माण करणार आहेत. याशिवाय  १२० प्रकल्प हे मिनिटाला पाचशे लिटर प्राणवायू तयार करणार असून ते प्रकल्प डेहराडून येथील भारतीय पेट्रोलियम संस्थेशी संबंधित उद्योग तयार करणार आहेत.

सिंगापूर, दुबईमधून आयात

भारतीय हवाई दलाने नऊ क्रायोजेनिक प्राणवायू  कंटेनर दुबई व सिंगापूरमधून भारतात आणले. पश्चिम बंगालमधील  पनागड येथे हे कंटेनर  दाखल झाल्याचे बुधवारी सांगण्यात आले. भारतीय हवाई दलाच्या ‘सी १७’ विमानांनी दोन क्रायोजेनिक प्राणवायू कंटेनर इंदूर येथून जामनगरला आणले. दोन कंटेनर जोधपूरहून उदयपूर व जामनगरला तर दोन हिंडोन येथून रांचीला आणले आहेत. भारतीय हवाई दलाच्या सी १७ विमानांनी सहा क्रायोजेनिक प्राणवायू  कंटेनर दुबईहून पनागडला आणले होते. सी १७ विमानांनी सिंगापूर येथून तीन प्राणवायू कंटेनर  पनागडला हवाई तळावर आणले.

वाचा- #Covid-19: ‘करोना धोरणाचा आराखडा’ देण्याचे केंद्राला निर्देश

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button