Breaking-newsआंतरराष्ट्रीयआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी
#Covid-19: ब्रिटनच्या लशीमुळे करोना होण्याचे प्रमाण ६५ टक्क्यांनी कमी
![States have 1.63 crore vaccine balance](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/vaccine-1.jpg)
नवी दिल्ली |
ऑक्सफर्ड/अॅस्ट्राझेन्का किंवा फायझर/बायोएनटेक या लशींची केवळ एकच मात्रा करोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण जवळपास ६५ टक्क्यांपर्यंत कमी करते, असे ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय यांनी केलेल्या अभ्यासात असे आढळले आहे की, या लशींची केवळ एकच मात्रा तरुण आणि ठणठणीत व्यक्तींसाठी जेवढी परिणामकारक आहे जवळपास तेवढीच ती वयोवृद्ध आणि असुरक्षित लोकांचे संरक्षण करण्यासही उपयुक्त आहे.
वाचा- #Lockdown: मे व जून महिन्यांत गरिबांना जादा मोफत धान्य