#Covid-19: जुलै 2021 पर्यंत 400-500 मिलीयन लसीचे डोस सुमारे 25 कोटी लोकांना पुरवण्याचे लक्ष्य- आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/harshvardhan.jpg)
नवी दिल्ली: गेल्या अनेक महिन्यांपासून देशाला कोरोना व्हायरस संसर्गाचा विळखा बसलेला आहे आणि दिवसागणित तो अधिकाधिक घट्ट होत आहे. त्यामुळे कोविड-19 वरील लसीच्या विकासाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे.
जुलै 2021 पर्यंत 400-500 मिलीयन लसीचे डोस सुमारे 25 कोटी लोकांना पुरवण्याचे लक्ष्य असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी संडे संवाद या कार्यक्रमात सांगितलेले आहे. लसीच्या विकासावर उच्चस्तरीय तज्ञ काम करत आहेत. जुलै 2021 पर्यंत भारत 400-500 मिलियन डोस 25 कोटी लोकांना पुरवले, असा आमचा अंदाज आणि उद्दिष्ट असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे. तसंच लस तयार झाल्यानंतर लसीच्या डोसांचे योग्य आणि न्याय वितरण होण्यासाठी सरकार 24 तास काम करत आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोनाची लस मिळेल, हे आमचे प्राधान्य असेल, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेले आहे.