breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयआरोग्यताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपुणेमुंबईराजकारणराष्ट्रिय

Covid 19 : कालबाह्य झाल्याने आम्ही 10 कोटी डोस फेकून दिले; अदर पूनावालांची माहिती

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

मुंबईसह राज्यभरातील कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी झाला असून, रुग्णसंख्याही कमी झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव घटल्याने देशभरातील निर्बंधही हटवण्यात आले आहे. शिवाय, अर्थचक्रही रुळावर आल्याने नागरिकांमधील कोरोनाची धास्ती कमी झाली आहे.

मुंबईसह राज्यभरातील कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी झाला असून, रुग्णसंख्याही कमी झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव घटल्याने देशभरातील निर्बंधही हटवण्यात आले आहे. शिवाय, अर्थचक्रही रुळावर आल्याने नागरिकांमधील कोरोनाची धास्ती कमी झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना लसीकडेही पाठ फिरवली आहे. याचा थेट परिणाम कोरोना लसीच्या उत्पादनावर झाला आहे. जवळपास कोविशिल्ड लसीचे 10 कोटी डोस कालबाह्य झाल्याने वाया गेले, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक आणि सीईओ अदर पूनावाला यांनी दिली.

“कोरोनाची लाट संपली अन् नागरिकांमध्ये कोरोना लसीकरणाबाबत तसेच बूस्टर डोसबाबत उदासीनता आहे. आम्ही डिसेंबर 2021 मध्ये कोविशिल्ड कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन थांबवले. तरीही कोविशिल्ड लसीचे 10 कोटी डोस कालबाह्य झाल्याने वाया गेले. कोरोनाची लाट संपली अन् नागरिकांमध्ये कोरोना लसीकरणाबाबत तसेच बूस्टर डोसबाबत उदासीनता आहे. आम्ही डिसेंबर 2021 मध्ये कोविशिल्ड कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन थांबवले. तरीही कोविशिल्ड लसीचे 10 कोटी डोस कालबाह्य झाल्याने वाया गेले”, अशी माहिती अदर पूनावाला यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

देशात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूमुळे 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे पाच लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोना विषाणू संसर्गामुळे एकूण 5 लाख 28 हजार 953 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. दरम्यान देशातील सक्रिय रुग्णांची संख्या घटली आहे. सध्या देशात 25 हजार 37 कोरोना उपचाराधीन रुग्ण आहेत. काल ही संख्या 26 हजार होती. 12 ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच सक्रिय रुग्णांची संख्या 26 हजारांच्या खाली पोहोचली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button