Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीपुणे
#CoronaVirus: ‘सीए’ना कोरोनाची लागण झाल्यास आर्थिक मदत, ICAI चा मोठा निर्णय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/corona-virus.jpg)
पुणे : कोरोना संक्रमणाच्या काळात ‘सीए’ना ऑडिटिंगसह इतर कामांसाठी बाहेर फिरावे लागते आहे. या दरम्यान जर त्यांना कोरोनाची लागण झाली तर त्यांना दीड लाख रुपयांची मदत करणार, असा निर्णय द इन्स्टि्यूट ऑफ चार्टर अकाऊंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) घेतला आहे. ही मदत आयसीएआय’ चार्टर्ड अकाऊटंट बनेव्हलंट फंडातून (CABF) केली जाणार आहे. लॉकडाऊननंतर अनलॉकमध्ये अनेक व्यवहार सुरू झाले आहेत.
पण ‘कोरोना’मुळे धोका टळलेला नाहीये. अशा स्थितीत ‘सीए’ना बँका, कंपन्यांचे कार्यालये, मोठ्या संस्था यासह अन्य ठिकाणी कामासाठी जावे लागते व अनेकांशी गाठी-भेटी होतात. सोशल डिस्टन्स राखला तरी धोका पूर्णपणे टळलेला नसतो. याचा विचार करून ‘आयसीएआय’ने चार्टर्ड अकाऊंटंट बनेव्हलंट फंडातून (सीएबीएफ) मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे.