breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: रुग्णांवर वेगवेगळ्या औषधांचा वापर
करोनाच्या रुग्णांवर कोणती औषधे परिणामकारक ठरू शकतील हे निश्चित सांगता येत नाही. प्रॉफिलेक्सिस, क्लोरोक्विन वा हायड्रोक्सिक्लोरोक्विन (एचसीक्यू) ही औषधे मलेरियावर उपचार करण्यासाठी शंभर वर्षांपासून घेतली जात आहेत. त्यामुळे ती सुरक्षित मानली जातात. एचसीक्यू हे विषाणूविरोधी असल्याचे आढळले आहे. त्याचा रुग्णांना उपयोग होत असल्याचेही दिसले आहे, असे भार्गव यांनी सांगितले.