breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: राज्यात दिवसभरात 5 हजार 714 रुग्णांना डिस्चार्ज
राज्यात दिवसभरात 5 हजार 714 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत 1 लाख 99 हजार 967 रुग्ण बरे झाले आहेत. तर 1 लाख 43 हजार 714 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 55.99 टक्क्यांवर पोहोचलं आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात आज 9615 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 357117 अशी झाली आहे. आज नवीन 5714 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 199967 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 143714 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) July 24, 2020