breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: मुंबईत ८२ वर्षीय महिलेने कोरोना व्हायरसवर केली मात
मुंबईच्या पश्चिम उपनगरात राहणारी एक ८२ वर्षीय महिला करोना व्हायरसमधून पूर्णपणे बरी होऊन आपल्या घरी परतली आहे. भारतात साठ-पासष्ट आणि त्यापुढच्या वयोगटातील नागरिकांचे करोना व्हायरसमुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. वयाची ८० ओलांडलेल्या महिलेने करोना व्हायरसवर मात करणे, हे सकारात्मक संकेत असून इतरांसाठी एक आशेचा किरण आहे.