#CoronaVirus: नवी मुंबईतील महिलेची कोरोनावर मात; नवजातबाळासह सुखरूप पोहोचली घरी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/navi-mumbai-news.jpg)
नवी मुंबई: महानगरपालिकेच्या सेक्टर १० वाशी येथील ‘डेडिकेटेड कोव्हीड-१९’ रुग्णालयामध्ये घणसोली येथील एका कोरोना पॉझिटिव्ह महिलेची प्रसुतीसाठी दाखल झाली होती. ही महिला सोमवारी करोनामुक्त होऊन आपल्या नवजात बाळासाह सुखरुप घरी परतली. दरम्यान, रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजून तिला आनंदानं निरोप दिला.
६ एप्रिल रोजी या महिलेचं रुग्णालयात सिझेरीअन आलं. या महिलेच्या ह्रदयविषयी गुंतागुंतीच्या स्थितीमध्ये देखील अत्यंत सुरक्षितरितीने तिची प्रसूती पार पाडली. यासाठी मेहनत घेतलेल्या महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे संपूर्ण राज्यभरातून आणि देशातून कौतूक करण्यात आले.
विशेष बाब म्हणजे या महिलेची आणि तिच्या बाळाची दोन वेळेस कोरोनाची चाचणी करण्यात आली. यामध्ये हे दोघेही करोनामुक्त असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या महिलेस आपल्या बाळासह रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी टाळ्यांच्या गजरात सुरक्षितपणे त्यांना घरी रवाना करण्यात आले. यावेळी या महिलेसह रूग्णालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्या डोळ्यांतही आनंदाश्रू तरळले.