breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: देशात साडेपाचशे कोरोनाचे नवे रुग्ण

देशव्यापी टाळेबंदीच्या सोळाव्या दिवशी, गुरुवारी देशात नवे ५४९ करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे देशभरात आतापर्यंत करोनाच्या रुग्णांची संख्या ५७३४ झाली आहे.

देशातील मृतांचा आकडा १६६ वर पोहोचला आहे. आतापर्यंत ४७३ रुग्णांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आले, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी गुरुवारी दिली.

करोनाच्या आतापर्यंत १ लाख ३० हजार जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यापैकी ५७३४ करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. गेल्या दोन महिन्यांतील एकूण चाचण्यांपैकी करोनाबाधितांची संख्या तीन ते पाच टक्के असून, त्यात फारसा बदल झालेला नसल्याचे अगरवाल यांनी सांगितले.

पीपीई, मास्क, कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्रे यांचा पुरवठा सुरूच आहे. एकूण १.७ कोटी पीपीई आणि ४९ हजार कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्रे मागवण्यात आली आहेत. करोनाच्या रुग्णांवर उपचार करत असलेले डॉक्टर, परिचारिका यांना वरील तिन्ही वैद्यकीय साधनांची मोठय़ा प्रमाणावर कमतरता भासत आहे. देशातील २० उत्पादकांकडून या साधनांची खरेदी केली जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button