breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: देशातील प्रत्येक घरात कशी पोहोचवणार कोरोना लस? मोदी सरकारचा असा आहे प्लॅन

नवी दिल्ली: कोरोनाचा संसर्ग जगभरात वेगानं पसरतो आहे. दिवसाला 50 ते 60 हजार नवीन रुग्ण भारतात समोर येत आहेत. अशा वेळी सर्व जगाचं लक्ष कोरोनाच्या लशीकडे लागलेलं आहे. बाजारात कधी उपलब्ध होणार आणि प्रत्येक नागरिकापर्यंत ती कशी पोहोचणार यासाठी केंद्र सरकार आणि आरोग्य विभागाच्या बैठका होत आहेत. भारतात सध्या बायोटेक कंपनीच्या लशीची चाचणी देखील सुरू आहे. तर ऑक्सफोर्डने तयार केलेल्या लशीची चाचणी तिसऱ्या टप्प्यात आहे. कोरोनावरची लस भारतात उपलब्ध व्हावी यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. ही लस प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार काय आणि कशी योजना तयार करत आहे जाणून घ्या.

वृत्तानुसार यावेळी भारत सरकारकडून वेगवेगळ्या योजना आखण्याचं काम सुरू केलेल आहे. याशिवाय वैज्ञानिक, शास्त्रज्ञ, विविध संस्थांचे अधिकारी यांच्यासोबत बैठक सुरू आहे. ही लस कशी प्रत्येक भागात आणि घरात पोहोचवता येईल यासंदर्भात विविध स्तरावर चर्चा सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारनं दोन कमिटी स्थापन केलेल्या आहेत. पहिल्या कमिटीमध्ये पंतप्रधान आणि वैज्ञानिक सल्लागार डॉक्टर के. विजयराघवन आहेत. हे कोरोनाच्या लशीच्या चाचणीवर लक्ष ठेवून आहेत. भारतात आणि जगभरात होणाऱ्या लशीच्या चाचण्यांवर त्यांचं लक्ष आहे.

प्रत्येक घरात कशी पोहोचवणार लस?

लस तयार झाल्यानंतर लोकांना लस कशी उपलब्ध करून द्यावी याबाबत काम सुरू आहे. कोणत्या प्रकारचे कोल्ड स्टोरेजला ठेवले पाहिजे. उदाहरणार्थ, अमेरिकेतील मॉडर्ना लस उणे 70 अंश सेल्सिअस ठेवणे आवश्यक आहे, परंतु ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि भारत बायोटेकमध्ये असे नाहीय. या व्यतिरिक्त ही समिती प्रथम लसीचा डोस कोणाकडून दिला जाईल यावरही विचार करत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button