breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी
#CoronaVirus: खाण्याच्या पॅकेटमधून तुमच्या घरामध्ये पोहोचतोय कोरोना?- WHO
पुणे: गेल्या तीन ते चार महिन्यांपासून संपूर्ण जगभरात कोरोनाचे सावट आहे. दरम्यान कोरोनाबाबतची बरीच माहिती सोशल मीडियावर विविध हवाल्यांच्या आधारे शेअर केली जाते. कोरोनाबाबत अनेक संभ्रम देखील सामान्यांमध्ये निर्माण झालेले आहे. या काळामध्ये खाण्याच्या पदार्थांची डिलिव्हरी देखील वाढलेली आहे. लॉकडाऊन शिथिल करण्यास सुरुवात झाल्यानंतर भारतातील विविध भागातही खाण्याचे पदार्थ घरपोच पोहोचवले जात आहेत. अशावेळी खाण्यातून किंवा खाण्याच्या पॅकेटमधून कोरोना पसरतो असा सवाल सामान्यांमध्ये निर्माण झालेला आहे.
यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्टीकरण दिलेले आहे. WHO च्या मते खाणे किंवा खाण्याच्या पॅकेटमधून कोरोना पसरतो याबाबत ठोस पुरावे मिळालेले नाहीयेत. जागतिक आरोग्य संस्थेने खाण्यातून कोरोना पसरतो अशा प्रकारची भीती न बाळगण्याचे आवाहन केलेले आहे.