breaking-newsआरोग्यटेक -तंत्रताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: कोरोना व्हायरस मानवनिर्मित; नोबेल विजेत्या वैज्ञानिकाचा दावा
सध्या करोनानं जगभरात थैमान घातलं आहे. सर्वच देश करोनाशी लढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अमेरिका, फ्रान्स, इटली, जर्मनी यांसारख्या देशांना करोनाचा मोठा फटका बसला आहे. त्यातच चीन आणि अमेरिका हे देश एकमेकांवर निशाणा साधत आहेत. दरम्यान, फ्रान्सचे नोबेल पुरस्कार विजेते डॉ. ल्यूक मॉन्टेग्निअर यांनी एक खबळजनक दावा केला आहे. करोना व्हायरस हा मानवनिर्मित असल्याचा दावा त्यांनी केला आहे.