breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: कोरोनावर ‘स्वदेशी’ लस इतक्यात नाही, अजून लागेल वर्षभराचा कालावधी

संपूर्ण जगाला त्रस्त करुन सोडणाऱ्या करोना व्हायरसवर प्रभावी औषध शोधून काढण्यासाठी जगभरात मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. जगभरात सध्या लस संशोधनाचे एकूण १०० प्रकल्प सुरु आहेत. भारतात आयसीएमआर इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड मिळून करोनाला रोखणारी लस विकसित करत आहेत.

करोना व्हायरसमधून बाजूला करण्यात आलेल्या स्ट्रेन इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या पुण्यातील नॅशनल इन्स्टियुट ऑफ वायरोलॉजी लॅबमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. या स्ट्रेन भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड म्हणजे बीबीआयएलकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. 

“करोना व्हायरस विरोधात लस विकसित झाल्यानंतर सर्वप्रथम आधी प्राण्यांवर चाचणी केली जाईल. त्यानंतर मानवी चाचण्या सुरु होतील. लस कितपत सुरक्षित आणि प्रभावी आहे ते या चाचण्यांमधून सिद्ध होईल. या सर्व प्रक्रियेला एक वर्ष लागेल” असे आयसीएमआरच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. बीबीआयएल व्हायरसला संपवणारी लस विकसित करत आहे. ही लस टोचल्यानंतर शरीरात इन्फेक्शन विरोधात अँटीबॉडी तयार होईल.

करोना व्हायरसवरील या लस निर्मितीच्या प्रकल्पाला पीएम केअर्स फंडातून १०० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. सिरम इन्स्टियुट, काडिला, इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेड आणि भारत बायोटक या चार कंपन्या लस विकसित करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button