Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीमुंबई
मुंबईत कोरोनाचे २४ तासांत ३५६८ रुग्ण
![मुंबईत कोरोनाचे २४ तासांत ३५६८ रुग्ण](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/coronavirus-2-1.jpg)
मुंबई |
आठवड्याभरापासून मुंबईतील करोना रुग्णसंख्येचा आलेख झपाट्याने खाली येत आहे. १५ जानेवारीला मुंबईत १० हजार रुग्ण आढळले होते. त्यानंतर मात्र ही संख्या ८ ते ५ हजारांवर आली आणि शनिवारी यात आणखी मोठी घट झाली आहे. शनिवारी मुंबईत ३ हजार ५६८ रुग्ण आढळले असून जानेवारीत पहिल्यांदाच इतके कमी रुग्ण आढळले आहेत.
१ जानेवारीला ६३४७ रुग्ण आढळले आणि पाहता पाहता हा आकडा अवघ्या पाच दिवसांत २० हजारांवर पोहोचला. ६,७,८ जानेवारीला २० हजाराच्या वर रुग्ण आढळले. शनिवारी ४९ हजार ८९५ चाचण्या झाल्या असून यात ३ हजार ५६८ रुग्ण आढळले आहेत. शनिवारी मुंबईत १० मृत्यू झाले असून मुंबईतील एकूण करोनाबळींची संख्या १६ हजार ५२२ वर पोहोचली आहे.