भोसरी येथे मोफत आ. भा. हेल्थ कार्ड उपक्रमाला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
![Come to Bhosari for free. Bh. Spontaneous response of citizens to health card initiative](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/A.-Bha-Health-Card-780x340.jpeg)
- भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा व कविता भोंगाळे युवा मंचच्या संयुक्त विद्यमाने स्तुत्य उपक्रमाचे आयोजन
भोसरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा व कविता भोंगाळे युवा मंचच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आयुष्यमान भारत कार्ड उपक्रमाला भोसरी-दिघी परिसरातील हजारो नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना पहायला मिळत आहे.
27 नोव्हेंबर रोजी आ. महेशदादा लांडगे यांचा वाढिदवस असतो. परंतु या वर्षी दादांच्या मातोश्री स्व. सौ. हिराबाई लांडगे यांचे आकस्मीत निधन झाल्यामुळे दादा मातृशोकाच्या दुखातून आता कुठे सावरत असून, यावर्षी दादांचा वाढदिवस तसेच कोणतेही मनोरंजनाचे कायर्क्रम आयोजत करण्यात आले नव्हते.
विवध सामाजिक उपक्रम कल्पकतेने राबवण्यात सदैव अग्रेसर असलेल्या भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस कविता भोंगाळे यांनी मातृछत्र कै.सौ. हिराबाई लांडगे यांच्या स्मरणार्थ आ. महेशदादा लांडगे यांच्या मागर्दशर्नाखाली आरोग्याचा महायज्ञ या मोहिमेंतगर्त प्रभाग ७ मधील २५,००० नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारे आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड (आभा कार्ड) मोफत काढून देण्याचा सामाजिक उपक्रम हाती घेतला. केंद्र शासनाकडून गोरगरिबांना मोफत उपचार मिळण्यासाठी तसेच ५ लाख रुपयांपर्यंतच्या आजारांच्या उपचारासाठी विमा मिळण्यासाठी आभा कार्ड आवश्यक असल्यामुळे कार्डचे महत्व पाहता नागरिकांचा या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हजारोंच्या संख्येने नागरीकांना मोफत आभा कार्ड काढून दिले जात आहे. अधिक माहितीसाठी 9359572088 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकाकडून करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल भाजपा महिला मोर्चा सरिचटणीस कवीता भोंगळे यांचे नागरीकांनी आभार मानले.