आरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरातील 18 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना मंगळवारी ‘कोविशिल्ड’ची लस ‘या’ केंद्रांवर मिळणार

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड शहरातील 18 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (मंगळवारी) ‘कोविशिल्ड’, ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप, ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने आणि किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे.

18 ते 44 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना या केंद्रांवर मिळणार पहिला, दुसरा डोस!
हेडगेवार जलतरण तलाव, प्रेमलोक पार्क दवाखाना, महापालिका शाळा वाल्हेकरवाडी, नेहरुनगर उर्दु शाळा, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळेसौदागर, नवीन भोसरी रुग्णालय,सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, घरकुल दवाखाना चिखली, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल फुलेनगर, यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा ग प्रभाग आणि आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी या 11 केंद्रांवर कोविन अ‍ॅपवरुन बुकिंग केलेल्या आणि किऑस्क प्रणालीद्वारे टोकन मिळविलेल्या लाभार्थ्यांना ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. कोविन अ‍ॅपवर नोंदणीसाठी सकाळी 8 नंतर स्लॉट बुकिंगसाठी ओपन करण्यात येणार आहेत.

या ‘आठ’ ठिकाणी ऑनदस्पॉट ‘कोविशिल्ड’ची लस मिळणार!
कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, जुने तालेरा रुग्णालय, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, जुने खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, यमुनानगर रुग्णालय,जुने जिजामाता रुग्णालय आणि निळु फुले नाट्यगृह पिंपळेगुरव या आठ ठिकाणी ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन पद्धतीने 18 ते 44 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.

ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन पद्धतीने 18 ते 44 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना या केंद्रांवर लस मिळणार!
संजय काळे सभागृह, ईसआयएस हॉस्पिटल मोहननगर, साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना, आरटीटीसी सेंटर, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, महापालिका शाळा किवळे, बिलजीनगर दवाखाना, सेकटर 29 रावेत, नेहरुनगर उर्दु शाळा, महापालिका शाळा खराळवाडी, क्वालिटी सर्कल भोसरी, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर,पिंपळेगुरव माध्यमिक शाळा, पिंपळेनिलख इंगोले शाळा, महापालिका शाळा वाकड, आबाजी रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळा भूमकर वस्ती, मारुती गेनू कस्पटे प्राथमिक शाळा, महापालिका शाळा बोपखेल, सखुबाई गार्डन भोसरी, छत्रपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय दिघी, पंडित जवाहरलाल नेहरु शाळा च-होली, गंगोत्री पार्क दिघी,कन्या शाळा चिखली, महापालिका शाळा जाधववाडी, रूपीनगर शाळा, स्केटिंग ग्राऊंड यमुनानगर, प्राथमिक शाळा म्हेत्रे वस्ती, तळवडे समाज मंदिर शाळा, नूतन शाळा ताम्हाणे वस्ती,कांतीलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा मंगलनगर, थेरगाव, महापालिका शाळा रहाटणी, कर्मवीर भाऊराव पाटील वाघेरे ड प्रभाग, गणेश इंग्लिश स्कुल दापोडी, दिनदयाल शाळा पवना बँके मागे, संत तुकारामनगर, पिंपरी,शितोळे शाळा जुनी सांगवी, कासारवाडी दवाखाना आणि बालाजी लॉन्स जुनी सांगवी या 36 केंद्रांवर कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.

तर, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल शिवतेजनगर आणि मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, येथे 18 ते 44 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना 50 च्या क्षमतेने ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस मिळणार आहे.

स्तनदा माता, गरोदर महिलांना या केंद्रांवर मिळणार लस!
सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय आणि जुने तालेरा रुग्णालय येथे स्तनदा माता, गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. काही डोस राखीव ठेवण्यात आले आहेत. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप या पद्धतीने लसीकरण करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button