भारतात आढळलेल्या विषाणू उत्परिवर्तनाबाबत अॅस्ट्राझेनेकाची लस प्रभावी
![AstraZeneca vaccine is effective against viral mutations found in India](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/AstraZeneca-Vaccine.jpg)
- भारतात आढळलेल्या विषाणू उत्परिवर्तनाबाबत ब्रिटनमध्ये संशोधन
लंडन |
भारतात आढळून आलेल्या बी १.६१७.२ या विषाणू उपप्रकारावर अॅस्ट्राझेनेका आणि फायझर बायोएनटेक या लशी प्रभावी असल्याचे ब्रिटनमधील एका अभ्यासात दिसून आले आहे. मात्र त्यासाठी दुसरी मात्रा वेळेतच घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. बी १.६१७.२ हा विषाणूचा उत्परिवर्तित प्रकार भारतात आढळून आला होता.
पब्लिक हेल्थ इंग्लंड या संस्थेने म्हटले आहे, की फायझर बायोएनटेक लस या विषाणूवर ८८ टक्के प्रभावी आहे. हे प्रमाण लक्षणे असलेल्या रुग्णातील आहे. पण ही परिणामकारकता दुसरी मात्रा घेतल्यानंतर दोन आठवडय़ांनी दिसून येते. ऑक्सफर्ड- अॅस्ट्राझेनेकाची लस लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये साठ टक्के प्रभावी आहे. बी. १.६१७.२ या विषाणू उपप्रकारावर या लशी प्रभावी ठरल्याचे दिसून आले आहे. पण दोन्ही लशींची परिणामकारकता पहिल्या मात्रेनंतर केवळ ३३ टक्के आहे. त्यामुळे दुसरी मात्रा वेळेत घेणे आवश्यक आहे.
वाचा- राज्यातील सहा हजार बालरोग तज्ज्ञांना कोविड टास्क फोर्सने केले मार्गदर्शन!