आरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
रविवारी शहरात 52 नवीन रुग्ण; 59 जणांना डिस्चार्ज
पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 14) दिवसभरात 52 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 59 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 2 लाख 76 हजार 782 एवढी झाली आहे. तर आजवर 2 लाख 72 हजार 585 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.रविवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 4 हजार 500 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.शहरात 428 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील 183 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 245 जणांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.पिंपरी चिंचवड शहरात रविवारी पालिकेच्या 69 आणि खासगी 132 लसीकरण केंद्रांवर 12 हजार 939 नागरिकांचे लसीकरण झाले असून आजवर शहरातील 24 लाख 8 हजार 754 जणांनी लस घेतली आहे.