breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

सामान्य लोकांना वाचता येईल, अशाच अक्षरात प्रिस्क्रिप्शन लिहा, न्यायालयाचे डॉक्टर वर्गाला आदेश

सामान्य लोकांना वाचता येईल, अशाच अक्षरात प्रिस्क्रिप्शन लिहा, असे आदेश डॉक्टरांना थेट कोर्टाकडून मिळाले आहेत. ओडिशाच्या उच्च न्यायालयानं हे आदेश दिलेले आहेत. एका व्यक्तीनं पत्नीची काळजी घेण्यासाठी जामिनासाठी अर्ज केला होता. पुरावा म्हणून संबंधित व्यक्तीनं डॉक्टरांनी दिलेलं प्रिस्क्रिप्शन कोर्टाला दाखवलं होत. त्यावर लिहिलेला मजकूर वाचणं अशक्य असल्याचं म्हणत कोर्टानं हा अनोखा आदेश दिला आहे. यापुढे डॉक्टरांनी कॅपिटल अक्षरात सर्वांना समजेल अशा अक्षरात औषध लिहून द्यावी, असंही कोर्टानं म्हटलेलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button