breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

व्यक्ती कोरोनाबाधित आहे की नाही हे कोणत्या लक्षणांवरून ओळखावं…

कोणता व्यक्ती कोरोना संक्रमित आहे की सामान्य तापाने आजारी हे समजण म्हणजे मोठा टास्क होऊन बसला आहे. करोनाची गंभीर आणि सामान्य दोन्ही लक्षणं जाणून घेऊयात…

हैराण करून सोडणारी सर्दी, वांरवार शिंका येणे, खोकला आणि ताप ही अशी काही लक्षणे आहेत ज्यांना कोरोनाची प्रारंभिक लक्षणे म्हणून ओळखले जातात. समस्या ही आहे की हीच लक्षणे सामान्य तापाच्या आजारातही दिसून येतात. म्हणून कोणत्याही व्यक्तीत अशी लक्षणे दिसल्यास आपण थेट त्या व्यक्तीला करोना आहे असं म्हणू शकत नाही. त्या व्यक्तीला आपली चाचणी करूनच कोरोना आहे की नाही याचे निदान होतं. आपल्याला माहित आहेच की कोव्हीड-19 एक असा आजार आहे जो जुन्या विषाणूंच्या जातीतील अधिक प्रभावी विषाणूंमुळे पसरतो आहे.

म्हणजेच कोरोनाचे विषाणू आपल्या आयुष्यात पहिल्यापासूनच आहेत, पण जुने विषाणू साधा ताप सर्दी पसरवायचे, पण हे नवीन विषाणू जीवघेणा ताप पसरवतात. म्हणूनच या विषाणूला अधिक घातक घोषित करण्यात आले असून याच कारणामुळे यावर लस शोधण्यात विलंब होत आहे.

कोरोनाची लक्षणे सहजपणे समजून घेण्यासाठी त्यांची दोन भागांत विभागणी करता येते. पहिल्या गटात ती लक्षणे आहेत जी अगदी सामान्य आहेत आणि जर फक्त हीच लक्षणे एखाद्या कोरोना संक्रमित रूग्णामध्ये आढळत असतील तर त्याच्या जीवाला काही धोका नाही व सामान्य औषधांनी आणि काही महत्त्वाची सुरक्षा राखून तो व्यक्ती बर होऊ शकतो. ताप येणे, सुका खोकला येणे आणि वारंवार थकवा जाणवणे फक्त हि लक्षणे अतिशय सामान्य ठरवली गेली आहेत. हि लक्षणे असल्यास करोनामुळे जीव जाण्याची शक्यता कमी असते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button