breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

लसूण तेल नितळ त्वचा-केसांच्या समस्यांवर रामबाण उपाय

आरोग्यासाठी पोषक अशा कित्येक गुणकारी औषधी वनस्पती आपल्या स्वयंपाकघरात असतात. यापैकीच एक म्हणजे लसूण. विविध पाककृतींची चव वाढवण्यासाठी त्यामध्ये लसूण न विसरता वापरतो. जे आरोग्यासाठी फायदेशीर देखील असतं. पण लसूण तेल त्वचा, केस आणि तोंडाच्या आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर आहे. नियमित लसूण खाल्ल्यास रक्तदाब, कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी तसंच स्मृतिभ्रंशचा धोका टाळण्यासाठी मदत होते. लसूणमध्ये सल्फर नावाचं कम्पाउंड आहे, जे कर्करोगाच्या पेशी शरीरात वाढण्यापासून रोखण्याचं कार्य करतात, अशी माहिती काही संशोधनाद्वारे समोर आली आहे. यातील अँटीऑक्सिडेंट्सच्या गुणधर्मामुळे अकाली येणाऱ्या वृद्धत्वाची लक्षणं कमी होण्यास मदत होते.

 लसूण तेल कसे करावे?

-लसूणच्या पाकळ्यांवरील साल काढून त्याचे बारीक तुकडे करून घ्या.

– एका मोठ्या कढईमध्ये ऑलिव्ह ऑईल घेऊन त्यामध्ये बारीक कापलेले लसूण टाकावेत बारीक कापलेले लसूण तेलामध्ये योग्य पद्धतीनं मिक्स होऊ द्यावे.
– मध्यम आचेवर लसूण-तेल काही मिनिटांसाठी गरम करत ठेवा.
– पण तेल जास्त वेळ गरम करू नका, कारण लसूण करपण्याची शक्यता आहे.
– गॅस बंद करून काही तेल थंड करून घ्या.
– यानंतर एका भांड्यामध्ये तेल गाळून घ्या आणि एका बॉटलमध्ये तेल साठवून ठेवा.

केसगळती थांबते

लसूण कच्च्या स्वरुपात किंवा जेवणातून खाल्ल्यासही शरीराला बरेच आरोग्यदायी फायदे मिळतील. लसूण खाल्ल्यास केसांची चांगली वाढ देखील होते. कच्च्या लसूणमध्ये प्रचंड प्रमाणात जीवनसत्त्व आणि खनिजांचा समावेश आहे. यामध्ये व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी आणि सेलेनियमचे गुणधर्म आहेत. केसांचं आरोग्य जपण्यासाठी हे घटक पोषक आहेत. यामधील अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-फंगलचे गुणधर्मामुळे टाळूवरील त्वचेचं आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

नितळ त्‍वचेसाठी लसूण तेल लाभदायक

लसूण अर्क तसंच तेलामध्ये जखम भरून काढण्याचे गुणधर्म आहेत. लसूण तेलाचा अँटी-बायोटिक आणि अँटीसेप्टिक औषधांचा पर्याय म्हणून वापर केला जाऊ शकतो. लसूण तेलाच्या वापरामुळे त्वचेसंबंधित सर्व समस्यांतून सुटका मिळू शकते. उदाहरणार्थ : मुरुमे, सोरायसिस, संसर्ग, मुरुमांचे डाग, सुरकुत्या आणि वृद्धत्वाच्या लक्षणे कमी करण्यास मदत होते.

लसूण तेलामुळे तोंडाचे आरोग्य सुधारते
लसूणमध्ये अ‍ॅलिसिन नावाचे तत्त्वे आहेत. या घटकामुळे हिरड्यांशी संबंधित रोगांशी लढायला मदतमिळते. अ‍ॅलिसिन दात किडण्यापासून रोखण्यात मदत करते. लसूण तेल आणि हळदीचं मिश्रण एकत्र करून टुथपेस्ट तयार करून घ्या. या मिश्रणानं नियमित दात स्वच्छ केल्यास दात दुखी, जिवाणू संसर्गाविरोधात लढण्यास मदत मिळते. हळदीमध्ये अँटी-मायक्रोबिअल आणि सूज न येण्याचे गुणधर्म आहेत. दिवसातून कमीतकमी दोन वेळा लसूण तेलानं दात घासल्यास हिरड्यांना आलेली सूज कमी होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button