breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

बाजारातून सामान आणताना घ्या ‘ही’ काळजी

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता सरकारने देशव्यापी लॉकडाऊन घोषित केला आहे. लॉकडाऊनच्या काळात सरकारने नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी २४ तास दुकानं चालू ठेवण्याचे आणि बाजार देखील सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र सरकारने बाजारात जाण्यासाठी मुभा दिली म्हणून त्याठिकाणी गर्दी करणे चूकीचे आहे. आपली एक चूक महागात पडू शकते. त्यामुळे जर तुम्ही बाजार सामान खरेदीसाठी जात असाल तर सावधानता बाळगली पाहिजे. कारण दूध, ब्रेडसह इतर सामानाद्वारे कोरोना आपल्या घरात येऊ शकतो. त्यामुळे आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे.

बाजारात जाताना आणि बाजारातून सामान घरी आणताना ही काऴजी घ्या…

– हेल्पलाइनद्वारे गरजेच्या वस्तू मागवा. दुकानांमध्ये जाणे टाळा.

– नजीकचा दुकानदार घरी वस्तू आणून देत असेल तर त्याला सांगा.

– बिग बाजार आणि अन्य स्टोअर व्हॉट्सअॅप किंवा फोन नंबरवर ऑर्डर्स घेत आहेत त्यांच्याकडून सामान मागवा. 

– दुकानात गर्दी असेल तर दूर उभे रहा. गर्दी कमी झाल्यानंतर वस्तू घ्या.

 – दुकानदारापासून एक मीटर दूर उभे राहून बोला. 

– दुकानदारालाच सामान पिशवीमध्ये ठेवण्यास सांगा. 

– सामान घेण्यापूर्वी हात साबणाने धुवा किंवा सॅनिटायझरचा वापर करा. 

– वयोवृध्द आणि लहान मुलांना वस्तू खरेदीसाठी बाहेर पाठवू नका.

– बाजारात जात असाल तर मास्क लावून जा. मास्क नसेल तर स्वच्छ रुमाल तोंडाला बांधा.

– बाजारात गेला तरी सॅनिटायझर सोबत ठेवा.

– खोकताना आणि शिंकताना तोंडाला रुमाल लावा.

– बाजारात वस्तू खरेदी करताना त्यांना हात लावू नका. 

– बाजारातून घरी आल्यानंतर आधी हात साबणाने आणि गरम पाण्याने स्वच्छ धुवा.

– जी कपडे घालून बाजारात गेला ती कपडे घरी आल्यानंतर लगेच गरम पाण्यामध्ये भिजत ठेवून धुवून टाका.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button